________________
प्रसंग नववा
अथ अमूढत्वांगे रेवतिराणि कथा । अहंत सिद्धाचार्यगुणी । पावकसाधुमहामुनि । मन्नमन त्याहाचे चरणि । कथारंभ निसिद्धि व्हाया || १|| मायमाझि वागेश्वरि । जिची त्रैलोक्य कीर्ति थोरी | ते वंदू धरोनि भाव भारि । ते ज्ञानसागरि मज खेळवि || २ || श्रेणिक म्हणेगा गणपति । अमूढ अंग पाले रेवति ।
1
प्रख्यात झाली त्रिजगति । तत्कथा सभा प्रति सांगिजे ॥३॥ गौतमस्वामी ऐकोनि प्रश्न । कथामिष्ट अमृतपान । वदता झाला जनाकारण | जेव्हे होय हान त्रितापाचि || ४ || जंबूद्वीपा माजिसार । भरतक्षेत्र असे सुंदर |
जेथे मुनींद्र करिति नित्य विहार । तद्वर्णन फार काय करू ||५|| त्यामाजिविजयार्ध पर्वत । असे महत् विस्तारवंत | I नपुरग्रामे करोनि सोभित । किंवा निर्मित धनद हस्ते || ६ || तयाचे दक्षणदिशा प्रति । मेघकूट नामे नग्रासति । इंद्रपुरी वद्भासति । तेथे नांदति जन श्रावक ||७|| त्यानगराचा नृपवर । असे खगचंडसागर । प्रख्यात असे देशावर । श्रावकाचार नित्यपालिति ||८|| राज्य करिता बहुत दिवस । मन झाले उदास । राज्य देवोनि पुत्रास । तीर्थयात्रास निघाला ||९||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org