________________
प्रसंग नववा : १२७
त्या नगराचा राजा । वरुणाख्य असे वोजा ।। रेवति राज्ञी तयाचि भार्या । सम्यक्त्वध्वजा चढविसि ॥७०॥ तिची परीक्षा करायासि । क्षुल्लक विचारि मानसि । विद्याप्रभाव पूर्वं दिसि । ब्रह्मरूपासि धरिले ॥७१॥ कमलावरी पद्मासन | बैसला कमंडल घेऊन ।
यज्ञोपवीत चतुर्वदन । करितसे पठन वेदध्वनि ॥ ७२ ॥ वेद वेदांत वदे व्यक्त । रंजवीति जनाहित ।
देवदेवि मिळाले असंख्यात । वाद्य नृत्य गीत करिति उत्सव ॥ ७३ ॥ ऐसे ऐकोनि भूपति । महाहर्ष धरोनि चित्ति ।
जनसहित जाओनि नुति । करिति चित्ति धरोनि भाव ॥८२॥ नृपासहित भव्यसेन । आनिक असति जे अज्ञान ।
ते मोहित त्याकारण । करिति पूजन वंदनादिक ॥ ८३॥
नृपाने दूत पाठविले । राज्ञिकारणे बोलाविले ।
चित्ति विचारोनि राज्ञि बोले । म्हणे ब्रह्मदेव आले कोठोनिया८४
आद - ब्रह्मा चतुर्थकाली । होवोनि गेला या स्थळ । पुन्हा कैसा आला भूमंडळ । जनाचे उद्दालि कैसे पातक ॥ ८५ ॥ दूत वदे राज्ञिकारण । नृपाचा थोर भाव पाहून ।
नृप
आनि तुजकारण | आलासे दर्शन द्यावयासि ॥ ८६॥ असंख्यात देवदेवी । मिलाले असति त्या ठायी । ज्या पुरुषाचे असे दैवी । तयासी होईल दर्शन || ८७ || दूतवाक्य ऐकोनि रेवति । म्हणे श्री जिन आदि जिनपति । होवोनि गेला या क्षिति | अद्याप कीर्ति ज्याची असे ||८८|| हा कोण्ही असे धूर्त । विद्याबले लोकाहित । ब्रह्मरूप मायायुक्त । करोनि जनांत दाखविति ॥ ८९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org