________________
प्रसंग आठवा : ११९
माया वेश करोनि दूर । नृप गुणाचि प्रसंसा थोर । करू लागला वारंवार । जडलि प्रीति फार सम्यक्तावरि ||४५ ॥ देव वदे नृपाकारण | धन्य तव सम्यक्तरत्न । निर्विचिकित्सा अंग पालिसि प्रेत्न । त्वत्सम गुण न दिसति जगी४६ राया त्वद्गुणाचे व्याख्यान | स्वमुखे केले सौ धर्मेंद्रान । अधिक दिससि त्याहून । स्वता म्या यवोन पाहिले ॥४७॥ म्या असत्य मानोनि मानसि । आलो त्वत्परीक्षा पाहायासि । पाहोनिया तव गुणरासी । संतुष्ट मानसि थोर पावलो ॥४८॥ नृपाचि प्रसंसा थोर । करोनिया वारंवार । स्वर्गाप्रति गेला निर्जर । सम्यक्तावर प्रीति धरि ॥ ४९ ॥ इंद्राने जे होते कथिले । ते सर्व विदीत केले । वस्त्राभूषणे पूजिले । हृदइ पावले थोर हर्ष ॥५०॥ अहो निर्विचिकिछितांग गुण । पालोनि नृपोद्यायन । झाला किर्तिचा भाजन । प्रसंसा इंद्रान केली ज्याचि ॥ ५१ ॥ स्वप्रतापे करोनि भूपती । नितिमार्गे राज्य करिति । जिनधर्मावरि थोर प्रीति । सदा करिति दान पूजा ॥ ५२ ॥ भोगभोगिता के दिवसि । बैसला होता स्वकिय सदसि । एक नर येवोनि रायासि । शतदल पुष्पासि भेटविले ॥५३॥ | स्वकरि घेवोनि नरेश्वर । निरीक्षण करि वारंवार ।
माजि पाहिला मृत्य भ्रमर । म्हणे धिक् संसार दुःखरासी ॥५४॥ एक्या विषय करोन । हा द्विरेफ पावला मरण । पंचेंद्रिय वश असति जे जन । तद्दुःख वर्णन कोन करी ||५५|| तदांतरी पावोनि वैराग । सांडोनि कुटुंब राज्यभोग । पुत्रासि राज्य देवोनि चांग । धरिला राग जिनपदि ॥ ५६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org