________________
११८ : आराधना कथाकीव त्या दुर्गध्य करोन । समीपवर्ती होते जे जन । ते पळाले त्रास मानून । दूर जावोन तिष्टले ॥३३॥ मुनी क्लेश पाहोनि भूपति । मुखे हाहाकार वदति । ममान्न मुनीप्रती । लाभ प्राप्ति नाहि झाला ॥३४॥ पूर्व पापोदयास्तव । मुनीसि झाला अंतराव । म्या आहार दिधला कुभाव। तत्फल सर्व दिसे जगि ॥३५॥ तो माया मुनी त्या नंतरी । प्रभावति राज्ञिवरी । वांत केले येकेसरी । राज्ञी अंतरी दुःख मानिति ॥३६।। मग भूपराज्ञी दोघे जन । उष्ण उदके करोन । तत्काया करिति प्रक्षाळन । अंतरि धरोन थोर भक्ति ॥३७॥ पुनःपुन्हा माया मुनिश्वर । वमन करिति नृपावर । तवतव करिति हाहाकार । राज्ञी नृप थोर दुःख मानिति ॥३८॥ पुन्हा प्रक्षाळोनि नित नित काया । सेवा भक्ती करिति राया। तव तव दाखविलि माया । पहावया नृप भक्ति ॥३९॥ नप म्हणे म्या विरुद्धान्नदाने । संतापिले मुनि कारने । ज्याचे अघोरे असता पुण्य । दान सिद्धि होने दुर्लभ ॥४०॥ उक्तंच । हा मया पापिना दत्तं विरुद्धं मुनयेऽशनं । महापुन्यविना पात्रदानसिद्धिर्न भूतले ॥४१॥ वृक्षामाजि कल्पतरू थोर । रत्नामाजि चिंतामनि प्रवर । कैचे पावे अल्प पुण्य नर । तथा मुनिश्वर निरंतराय ॥४२।। दुःखीत होवोनि भूपाल । स्वात्मनिंदा करि वेळोवेळ । म्हणे ममान्न दान सकल । झाले निष्फल पापोदय ॥४३॥ नृप भक्ति पाहोनि देव । म्हने धन्य धन्य हा राव । सम्यक्ता वीर असे दृढ भाव । हा पुण्यवान जीव दिसे जगि ।४।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org