________________
प्रसंग आठवा : ११७
इंद्र वाक्य ऐकोनि निर्जर । हृदइ हर्ष मानोनि थोर । प्रीति धरोनि सम्यक्तावर । वदति सत्वर इंद्राप्रति ॥२१॥ देवा मध्यलोका प्रति । कथिल्या प्रमाने युक्ति । ऐसा नर कोणि असति । ज्याचे हृदी असति सम्यग् भूषण ॥२२॥ देवेंद्र म्हणे हो रौरवपुरी । उद्यायन राजा राज्य करि। नित्य पुण्याचे भांडारभरि । सम्यक्तावरि दृढ प्रीति असे ॥२३॥ त्या माजि एक मिथ्याती । देव होता दुष्टमति । संसय मानोनि चित्ति । म्हने पाहु प्रचीति रायाचि ॥२४॥ यवोनिया रौरवपुरि । मुनिवेश घेवोनि सत्वरी । कुष्ट व्यापिला शरीरि । दुर्गंध थोरी न सहे जना ॥२५॥ रक्ते करोनि वाहाति व्रण । मक्षिका करिति भ्रमण । ऐसे पाहोनिया जन । जाती पळोन सत्वरी ॥२६॥ माध्यान्हवेला दोन प्रहरि । कराव्या कारण भावरी । नग्रामाजि प्रवेस करि । यवोनि नृप दारि तिष्टला ॥२७॥ महाव्याधि करोनि पीडित । मक्षिका जाल वेष्टित । या परि नृपाने मुनित । महादुःखित पाहिले ॥२८॥ नपासन्निध होते जे जन । ते गेले सर्वे पळोन । शीघ्र यवोनि नृपोद्यायन । केले पडिगाहन भक्तिभावे ॥२९॥ बैसवोनि उंच स्थानी । उष्ण उदके करोनि । युग्मपाद प्रक्षाळुनि । पूजा प्रणामी सत्कारिला ॥३०॥ मग प्रासुक आनि सरस । आहार दिधला मुनिस । नाना पक्वान्नादि षड्रस । जैसा राक्षस करिति भोजन ॥३१॥ पुष्कळ भोजन केल्यानंतर । भूपतीचे शरीरावर । वमन केले असार । दगंध थोर व्यापिला ॥३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org