________________
१०८ : आराधना कथाकोष देवि म्हने दुराचारी । हे शीलवान्नसे कुमरि । वंद्य असे पृथ्वीवरि । म्हणुन सिक्षा थोरि तुज लाविलि ॥४५॥ आता इचे शील खंडन । करू म्हनशी उन्मत्तपन । तरी समीप तव मरण । निश्चय जान आले असे ॥४६।। उपद्रव निवारोनि देवि । त्वरा गेलि निज ठाइ । भील्लेशविचारि हृदइ । म्हने बरे नाहि गृहि ठेविता ॥४७॥ शीलाचा दिसे थोर प्रभाव । ज्यासी साह्य असति देव । त्यासी काय करिति मानव । उपद्रव दुराचारी ॥४८॥ तदा त्याचे मंदिरी । येवोनि येक बि-हाडकरि । मेवे भेटवोनि अमृतापरि । सुस्थानि क्षणभरि बैसला ॥४९।। खुशाल होवोनि भिल्लेश । कन्या समर्पिलि त्यास । त्या घेवोनि बि-हाडास । अनंतमतीस आला त्वर ॥५०॥ तद्रूप पाहोनि सत्वरि । कामान लपेटला निजांतरि । बालासि विनवि नानापरि । जैसा भिखारि दातृगृहे ॥५॥ मग तो होवोनि उन्मत्त । वाक्य वदति भ्रष्ट चित्त । त्वा पुर्वावा मम हेत । तव चित्तात दया असे ॥५२।। हे सर्वेहि धन कण । पट्ट कुलादिक भूषण । सर्वहि असे तुज अर्पण । करावि पूर्ण मन्मनवांछा ॥५३॥ कन्या वदे सार्थनाथा । प्रियदत्त जैसा मम पिता । तैसा दिससि भ्रष्टचित्ता । भोगिसि त्वरिता दुःख दुर्गति ॥५४॥ उक्तंच । तयोक्तं यादृशोमेस्ति प्रियदत्तः पितापरः । तादृशस्त्वमपि भ्रष्टंमा वादी पापदं वचः ।।५५।। तच्चित्त पाहोनि अडोल । सार्थनाथ झाला निर्बल । अयोध्येसि येवोनि तत्काळ । पापमूल चिती हृदि ॥५६॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org