________________
प्रसंग सातवा : १०७
त्या भयंकर वनांतरी । पिता पिता हनु ( म्हणुन ) हाका मारी । मुक्तकंठ रोदन करि । हृदय स्मरि जिननाम ||३३|| तदाभीमाख्या भील्ल भूपपति । रूपवंत पाहोनि अनंतमती । घेवोनि गेला स्वगृहाप्रति । कुभाव चित्ति घरोनिया ||३४|| कन्या पाहोनि मनोहर । होता झाला कामातुर । तिज विनवी वारंवार । हा राजभांडार देतो तुज ||३५|| पुर्वावा मम मनोरथ । पट्टराज्ञीपद देईन तूत ।
मी सर्व भिल्लाचा असेनाथ । त्वा धरावि प्रीत मजवरि ॥ ३६ ॥ मजसि देवोनि भोगदान । किंकरासी करावे पावन ।
न तरी जाऊ पाहाते प्राण । करि रक्षण दयावंते ||३७|| तूं तव असे कृपावंत । कोमल असे तुझे चित्त । रति औषध देवोनि त्वरित । करी शांत कामरोग ||३८॥ दीनोक्ति वदोनि वारंवार । मस्तक ठेवि चरणावर । हात घालिति आंगावर । करिति थोर उपद्रव ॥ ३९॥ तदा बाला स्मरता जिनदेव । जानोनि तिचा शील सद्भाव । वनदेवी आलि घेवोनि धाव | बांधिला राव भीम नामे ||४०|| गुप्तगृहांतरि येउन । करु लागलि ताडन ।
उपसर्ग करिति दारुन । दुष्टा कारण वनदेवता ॥४१॥ तदाभिलेश वदे देवीसि । माते राख राख मजसि । देवि वदे जरि कन्येसि शरण । जासी तरि रक्षिण ॥ ४२ ॥ तद्भय मानोनि भिल्लराय । त्वरे कन्येचे धरिले पाय । म्हने मी लक्ष अभ्याइ माय । नमो जावे ममापराध ||४३|| मी असो तव किंकर । क्षमा करावि दासावर । दिनोक्ति वदोनि वारंवार | ठेवि चर्नावर मस्तक ||४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org