________________
१०६ : आराधना कथाकोष त्वाहि स्वकिय वचनोक्ति । अष्ट दिन मर्यादा युक्ति । नाहि कथिलि मजप्रति । म्या निज श्रुति न आइकिलि ॥२१॥ आता आइक मम वचन । देवगुरुशास्त्र साक्षित करून । जन्मपर्यंत मजकारण । असो नेम ब्रह्मचर्य ॥२२॥ जानोनि कन्येचा निश्चय । विवाहारंभाचा केला विलय । गृही येवोनि जैनोपाध्याय । सर्व शास्त्रार्थान्वय शिकविला ॥२३॥ कवने यकिय दिवसि । वसंत ऋतु चैत्रमासी । हिंदोळा बांधोनि वृक्षासि । गृहारामानंदेसि हिंदोदिति ॥२४॥ विजयाध पर्वतावरि । दक्षिजादिक किन्नर नगरि । नेत्री पाहाता जैसी इंद्रपुरि । सोभा थोरी काय वर्ण ॥२५॥ तेथीचा भूप कुंडल मंडित । सुकेशी भार्या सहित । बैसोनिया विमानात । होता जात आकाश मार्गे ॥२६॥ अधोभागे पाहिली बाला । निशाकरसम मुखमंडला। स्वरूपे जैसी सोभे कमला । बैसोनि हिंदोळा झुलत होती ॥२७॥ पाहोनि झाला कामातुर । म्हने ज्या गहि नाही ऐसि नार । स्याचा जाना व्यर्थ संसार । भूमिवर भार नरजन्म ॥२८॥ ऐसे चित्ति विचारुन । त्वरे निज गृहा जानुन ।। सुकेशि भार्यासि ठेवुन । आला फिरून बालासन्निध ॥२९॥ तिज बैसोनि विमानात । आकाशमार्गे चालिला त्वरित । सुकेशि म्हने मज ठेवोनि कांत । कौने कार्यात सीघ्र गेला ॥३०॥ निजयानि होवोनि आरूढ । हृदयी कोप धरोनि प्रौढ । भ्रतारा मागे धावलि गाढ । वासोनि दाढ यथा राक्षसि ॥३१॥ तदा भार्याचे भय मानोनि । पर्ण लब्धि विद्या पाचारोनि । भीमाटविमाजी दिल्लि टाकुनि । जैसी गगणा होती विद्युल्लत।३२।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org