________________
प्रसंग सहावा : १०१
जरि तो हार आणोनि देसि । तरीच मम भर्तार होसि । न तरि येवो न मद्गृहासि । निज वक्त्रासि दाउ नको ॥ ९७|| म्हणे प्रिय स्वर्गवस्तुचि इच्छा असे । ते मी आनीन सर्वसे । हे कार्य मम नखाग्रि नसे । दुन्हावित केसे मजप्रति ||१८|| त्वरे निघोनि तेथोनि । जावोनिया राजभुवनि ।
हार घेतला उपाय करोनि । राजमंदिरातुनि निघाला ।। ९९ ।। त्या हाराचा उद्योत । पडता झाला रस्त्यांत । कोट्टपाल पाहोनि व्यक्त । तस्करास जानितले ॥१००॥ धरा धरा करि पुत्कार । मागे लागले राजकिंकर । तदा काढोनिया हार | गांवाबाहिर पळाला ॥ १०१ ॥ श्मशानामाजि गेला तत्क्षणि । सोमदत्त पाहिला नयनि । चढनोत्तरन क्षणोक्षणि । काय म्हणोनी करतोसि ॥। १०२ ।। तो म्हणे जिनदत्त श्रेष्ठीन । आकाशगामिनि विद्याचे विधान । मज कथिले मंत्रसाधन । ते असाध्य जान दिसे मज ॥ १०३॥
अंजन पुसे तयासि । मंत्रविधि अरे कैसि । त्वरित वदावे मजसि । उसिरासि लावू नको ॥। १०४ ।।
तदा मंत्र पंचनमस्कार । कथिला शुद्ध पस्तीसाक्षर । संपूर्ण करोनि उच्चार । छेदिजे पदर युक्त येक येक ।। १०५ ॥ तदा सोमदत्ताकारण । छुरिका घेतली मागून ।
शिक्यामाजि बैसला जाऊन जिनदत्तवचन निश्चय हृदि ।। १०६
म्हणे श्रेष्ठीवाक्य निश्चय मज । सत्य असे मंत्रराज । निःशंक होवोनि हृदइ निज । छेदिले सहज सर्वपाद ॥ १०७ ॥ न पडता शस्त्रावरि । विद्या येवोनि क्षणाभीतरि । अंजना धरिला वरचेवरि । गेली अंबरी घेवोनिया || १०८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org