________________
१०० : माराधना कथाकोव
तो सोमदत्त गवार । चढे उतरे वारंवार |
तावत्काय झाला विचार । तो आइका चतुर सभाजन ॥ ८५ ॥ याचि नगरामाझारि । गणिका असे अंजनसुंदरि । अंजनतस्कर तिचे मंदिरि । दिवसरात्र जात असे ॥ ८६॥ ये दिवसि वसंतमासि । राज्ञिसहित ग्रामनारीसि । जावोनि आम्रवनासि । मनोल्हासि करिति क्रीडा ॥८७॥ सदा ते अंजनसुंदरि । राज्ञीचे कंठाभीतरि ।
रत्नहार पाहोनि सत्वरि । हृदइ विचारि दुःखित चित्ते ॥८८॥ जरि मम मंदिराप्रति । ऐसि वस्तु नसति ।
तरी धिक्कार असो मजप्रति । वृथा क्षितिभार केला ॥ ८९॥ शीघ्र स्वगृहासि येउन । पलंगावरि करोनि शयन ।
तळमळ करि दुःखित होउन । अन्न पान न आवडे ||१०|| तत्क्षणि तो तस्कर । निशामाजि दोन प्रहर ।
येवोनि तिच्या पलंगावरि । बैसोनि फार विनोद करिति ॥ ९१ ॥ तिजसि पाहोनि व्यग्रचित्त । वाक्य वदे हुंदतफुंदत ।
म्हणे गे काय व्यथा झालि व्याप्त । ते मज सांगि त्वरे ॥ ९२ ॥ प्रिये दुःखाचे कारण । त्वा वदावे मजलागुन ।
दुर्गम अथवा सुगम । नास करिन क्षणामाजि ।। ९३ ।। तदा गणिका वदे त्याप्रति । मद्वाक्य आइकावे जी पति । या नगरिचा भूपति । ऐसे धर्ममूर्ति प्रजापाल ।। ९४ ।। कनकमाला त्याची वल्लभा । रूपे जैसि तिलोत्तमारंभा । नित्य उपार्जित पुण्यलाभा । गृहाचि शोभा फार दिसे ।। ९५ ।। तिचे कंठि नवरत्नहार । म्या पाहिला मनोहर । त्या वाचोनि जन्मअसार । मम मंदिर वृथा दिसे ||९६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org