________________
प्रसंग सहावा : ९९
पस्तीस अक्षराचा सार । जपोनि मंत्र नवकार । सिंक्याचा एक एक पदर । धरोनि धीर छेदित जावे ॥७३।। या परिचे विधान । करोनिया दृढमन । जर करिसि विद्यासाधन । तुजकारण सिद्धि होईल ||७४॥ तो सेवक सोमदत्त । श्रेष्ठी वाक्य ऐकोनि व्यक्त । आचरिता झाला तद्दत्त । विद्याप्राप्त व्हाव्यास्तव ॥७५॥ कृष्णचतुर्दशिचे रयनि । सर्वसामग्रि मिळवोनि । बैसला सिक्यामाजि जाउनि । दृढ करोनि निजमन ॥७६।। पस्तीस अक्षरि मंत्रसार । स्थिरचित्ते करि उच्चार । सिंक्याचा यक यक पदर । छेदिति धीर धरोनिया ॥७७॥ ऐसे दहा पाच पाद जान । छेदिले दृढ करोनि मन । एकाकि अधोभागे पाहून । भयभीत मन झाले त्वरे ॥७८|| म्हणे हेऽस्त्र तीक्ष्ण दिसति । श्रेष्ठिने कथिलि युक्ति । पडताच विद्या नव्हे प्राप्ति । तरी प्राण जाति फुकाफुकि ॥७९|| ऐसा करुनि विचार । तरुतलि उतरला गवार । म्हणे हा प्राण गेलियावर । विद्या देण्हार काय आहे ॥८०॥ पुन्हा दृढ करोनि चित्ता । जावोनि बैसला शिक्यात । मंत्रोच्चार करोनि त्वरित । एक एक पादा तच्छेदति ॥८१॥ पुन्हा दुच्चित होऊनि मन । करिति चढनोसरन । कैचि सिद्धि निश्चयाविन । मूर्खालागुन होयेचिना ॥८२।। जिनेश्वराची वचनोक्ति । निश्चय नसे ज्या नरांप्रति । त्यासि कार्यसिद्धिप्राप्ति । त्रिजगति होयचिना ॥८३॥ उक्तंच । येषां श्रीमज्जिनेंदाणां, स्वर्गमोक्षसुखप्रदे। वाक्ये सन्निश्चयो नास्ति, तेषां सिद्धिनं भूतले ॥८४||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org