________________
९८ : आराधना-कथाकोष तेथे स्वर्णमय जिनालय । रत्नबिबउन्नतकाय । नयनि पाहता आनंद होय । पाप जाय पदं वदेत् ॥६॥ पंचमेरु आणि कुलाचलादिसिखरि । विजयाईसिद्धकूटावरि । सुवर्णमय जिनमंदिरि । करितो निरंतर जिनपूजा ॥६२॥ कोटि सूर्यचंद्राचे तेज। नखानि दिसे सहज । तेथे येवोनि देवराज । साधिति काज पुण्याचे ॥६३॥ तेथे जावोनि नित्यप्रति । करोनिया येतो पूजानुति । गुप्त येवोनि गृहाप्रति । वेवहाररीति चालवितो ॥६४॥ ऐकोनि श्रेष्ठीवचन म्हणे । स्वामी तू कृपेचा निधान । पोशावरि दया करोन । विद्यादान द्यावे मज ॥६५॥ मज विद्या प्राप्त झाल्यावरि । पूजाद्रव्य घेवोनि करि। नित्य येवोनि तुझे बरोबरि । पुण्य थोर मिळवीन ॥६६॥ त्वप्रसादे करोनि मज । पुण्य प्राप्त होईल सहज । जेण्हे स्वर्गाचे मिळे राज । मुक्तिभाज अनुक्रमे ॥६७॥ तदुक्त ऐकोनि जिनदत्त । सम्यग्दृष्टि दयावंत । विद्यासाधनाविधानात । दिल्हा त्याप्रति ॥६८॥ पूर्वि असावे षष्टोपवासि । मग कृष्णचतुर्दशिचे दिवसि । श्मशानि जावे महानिसि । भयभीतासि भयदायक ॥६९॥ शताष्टपादाचे जान । दर्भसिकेस करोनि निर्माण । वटतरुशाखासि बांधोन । त्यामाजि जावोन बैसजो ॥७०॥ शिक्याखालेतिदुर्धर । छुरिका भल्लका कटियार । उर्ध्वमुखे स्थापोनि शस्त्र । यथा वक्त्र यमाचे ॥७१॥ गंधाक्षतादि पूजा करोनि । असिपुत्रिका करि घेवोनि । पंचनमस्कार उच्चारुनि । छेदिजे तत्क्षणि यक यक पदा ॥७२॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org