________________
प्रसंग सहावा : ९७ निश्चल पाहोनि श्रेष्ठीचे मन । हृदि थोरानंद पाहून । म्हणे धन्य धन्य हे जिनशासन । हा श्रावक असोन महाशक्ति ४९ प्रातःकाल झाल्यावर । मायारूप करोनि दूर ।। तत्पदि करोनि नमस्कार । स्तुतिसार करू लागले ॥५०॥ सम्यकदृष्टिश्रावक जानुनि । थोर आनंद पावोनि मनि । विद्या दिधलि आकाशगामिनि । पुण्यसाधिनि श्रेष्ठीप्रति ।।५१।। तदा वदे तो आमितगति । हे विद्या झालि तुजप्रति । जे जे पुण्यक्षेत्र असति । त्या स्थानाप्रति नेईल त्वरा ॥५२॥ तुझिया वचने करोन । जो श्रावक असे भव्यजन । सम्यक्त्व दृढ असे ज्या कारण । त्यासि विद्यासाधन होईल ॥५३॥ ऐसे वदोनि निर्जर । स्वस्थानि जावोनि सत्वर । सांडोनिया मिथ्याचार । जिनधर्मावर प्रीति धरिलि ॥५४॥ झाली जानोनि विद्याप्राप्त । अकृत्रिम यात्रा करायात जाउ लागला निसिगुप्त । पुन्हा गृहात यती त्वरा ॥५५॥ नित्य उठोनि पश्चिमनिसि । पूजा द्रव्य घेवोनि हर्ष मानसि । जावोनि सिद्धकूटचैत्याल्यासि । जिनपंकजासि सदा पूजिति ॥५६॥ ऐसे करिता येक दिनि । सोमदत्त सेवकाने श्रेष्ठी। येता पाहिला नयनि । वदे वचनि श्रेष्ठीप्रति ॥५७॥ म्हणे अहो स्वामी दृढसम्यक्ति । नित्य उठोनि पश्चिमराति । जात असा कौने कार्या । सेवका निगुति सांगिजे ॥५८|| ऐकोनि सेवकाचे वचन । निष्कपट सरल प्रणाम । वदता झाला तयाकारन । करोनिया शुद्धमन ॥५९॥ आकासगामिनि मजप्रति । विद्या जालि असे प्राप्ति । तत्प्रसादे करोनि मेरूप्रति । नित्यप्रति जात असो ॥६०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org