________________
प्रसंग पाचवा ! ८१ व्रत पालिता निशिदिन । शरीर झाले अतिक्षीण। येके दिवसि नदीकारन । पाव्यासि जीवन गेला त्वरे ॥२५४|| तेथे कर्दमी मग्न झाला । तत्क्षणि तो कुर्कुटाहि" आला । इभ" मस्तकावरि बैसला । भक्षु लागला तत्पल" ॥२५५।। उक्तंच । क्षीणकायो नदीतीरे । निर्मग्नः कर्दमे तदा । श्रीभूतिचर सर्पण । कुर्कुटाख्येन भक्षितः ॥२५६।। तत्कालि तो गयवर । स्मरी पंच नमस्कार । सकल सन्यास घेवोनि सार । साधिले सत्वर समाधिमृत्यु ॥२५७|| मृत्युपावोनि शुद्धभाव । बारव्या स्वर्गि झाला देव । वृद्धिवंत श्रीधर नाव । सामान्य देवपद सेविति ॥२५८|| देवांगणामध्ये नितनित । नवनवे भोग भोगित । धर्मे करोनि त्रैलोक्यात । प्राणियात काय उणे ॥२५९॥ मुनि हत्या पापे करोनि । तो कुर्कुट सर्प मरोनि । चतुर्थ नरकि जानुनि । दुःखयोनि भोगिति ॥२६०॥ मग त्या दंतीचे दंत । मुक्ताफले करोनि सहित । भिल्लाने नेवोनि त्वरित । पूर्णचंद्र नृपात भेटविले ॥२६॥ ते दंत आणि मुक्ताफल । नृपाने पाहोनि सुढाल । भिल्लाकारणे तत्काळ । उचित पुष्कळ दीधले ॥२६२॥ मग बलावोनि स्वर्णकार । गुंफिला मुक्ताफलाचा हार । राज्ञि कंठे मनोहर । अति सुंदर सोभतसे ॥२६३।। त्या युग्मदंताचे च्यार पाये । करोनि पल्यं कि लाविले आहे । वरि पहुडोनि भोग भोगावे । सौख्यामाजि जाय दिननिसि ॥२६४||
३५. सर्प. ३६. हस्तीचे. ३७. मास.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org