________________
८० : आराधना-कथाकोष
तो असता महाचतुर । राज्य करिति असार । केवल दुर्गतिचे माहेर । धर्मांगिकार करील कधि ॥ २४३ ॥ ऐकोनि मातेचे वचन । मुनींद्र वदे तिज कारन । संसार विचित्र असे जान । ते मी सांगिन जननि तुज || २४४॥ सहसेन जो तव पति । राज्य करिता धर्मरीति । सर्पाने भक्षिले वर श्रीभुति । पावला मृति ततक्षणि ॥ २४५ ॥ मरोनिया आर्त्तध्याने । गजेंद्र झाला सल्लकिवने । मजवरि धावला क्रोधाने । माराव्या कारने मज प्रति ॥ २४६॥ मग म्या म्हनितले त्यासी । रे करींद्र मज का न जानसि । तू सिंहसेननृप होतासि | सींहपुरासि प्रसिद्ध ॥२४७॥
मी होये गा तव नंदम | सींहचंद्र नामे जान । मजवरि मोह धरोन । पालग्रहन केले त्वया ॥२४८||
आता होवोनि क्रोधयुक्त । आलासि मज माराव्यात । ऐसे वदता पावला शांत । उद्भविले त्यात जातीस्मृति || २४९|| मग करोनि दीर्घ स्वर । रोदन करी गयवर ।
मम पदि करी नमस्कार । वारंवार भक्तिभावे ॥ २५० ॥
मग तो बैसोनि मम पुढा । प्रस्तावा करू लागला गाढा । म्या धर्मोपदेश देवोनि प्रौढा | त्या तिर्थचमूढा संबोधिले || २५१ ॥ तेन्हे शुद्धभावसहित । मूलगुणाष्ट" पंचाणुव्रत । घेवोनिया त्वरित । दोषरहित पाळी सदा ||२५२॥
शुष्क तृण भक्षि निरंतरी । प्रासुक नीर प्राशन करी । जे आदले पाषाणावरि । वा दोनप्रहरि सूर्याताप ॥ २५३ ॥
३४. वड, पीपल, फेपरी, उंबर, कटुंबरफल, मद्य, मांस, मधु.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org