________________
प्रसंग पाचवा : ७९
मग तो सिंहसेन भूपति । आर्तध्याने पावोनि मृति । सल्लकिवने झाला हस्ती । कर्मगति करोनिया ॥२३२॥ तो सर्प वदोनि वैद्यास । अग्निकुंडे केला प्रवेस । मरोनि त्याचि बनास । पुन्हा आसीविश" उद्भविला ॥२३३॥ 'उक्तंच । मृत्वा कुर्कुटसर्पोभूत् पापी तत् सल्लकिवने । पापीनां पुनरावर्तो भवत्येनं कुयोनिषु ॥२३४|| पतिमृत्यु पाहोनि त्वरित । रामदत्ता होवोनि दुक्खित । शीव्र जावोनि बनात । महदिक्षात घेतले ॥२३५॥ पित्याचे पाहोनि मरण । सिंहचंद्र वैराग्य पाउन । पूर्णचंद्र बंधुकारन । दिल्हा संपूर्ण राज्यभार ॥२३६।। वनी जावोनि घेतलि दीक्षा । करपात्रि करिति भीक्षा। तपाग्नि करोनि कर्मकक्षा२ । करिति रक्षा वैरियाची ॥२३७॥ तपप्रभावे करोन । उद्भविले चतुर्थ ज्ञान । पृथ्विवरि करिति पर्यटन । भव्यजनसंबोधावया ॥२३८।। विहार करिता येके दिनि । सिंहचंद्र महामुनि । रामदत्तायिकाने पाहुनि । पाविलि मनि महदानंद ॥२३९॥ तत्समीप जानोनि सत्वरी । भक्ति धरोनि अंतरी । नमोस्तु केला चरणावरि । बैसली समोरि शुद्ध भावे ॥२४०॥ मग मुनिप्रति वदे ऐसी । स्वामी हे धन्य मम कुक्षी । जेन्हे नवमास वाहिले तुसि । पुरुषरत्नासि गुरुराया ॥२४१।। पूर्णचंद्र जो तवाऽनुज" । त्वा त्यासी दिधले थोर राज । तो मग्न असे त्यामाज । धर्मकाज विसरला ॥२४२।।
३१. सर्पचि झाला. ३२. वनाचि. ३३. भाऊ.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org