________________
७८ : आराधना कथाकोष
तदा सिंहसेन भूपति । कणि आइकोनि पुत्रोत्पत्ति । नानाविध उत्सव करिति । सिंहचंद्र इति नाव ठेविले ॥२२१॥ मग द्वितियाचे चंद्रापरि । दिवसदिवस वृद्धि करी । मोह करिति नरनारी । ऐसे पदरि थोर पुण्य ॥२२२॥ तदा भूप येके दिवसि । आनंद धरोनि मानसि । भांडारगृहामाजि प्रवेसि । निजद्रव्यासि पाहावया ॥२२३॥ तदा श्रीभूतिचर सर्प । नेत्रि पाहिला तो भूप । अद्भुत उद्भवला कोप त्यात । खादले पापकमियाने ॥२२४।। तत्क्षणि चढिले महाविष । अचेचन झाला तो नरेश । शीघ्र बाहोनि मांत्रिकाहिस । ते उपायास करिताति ॥२२५।। मुख्य सुघोष मंत्रवादिन । स्वमंत्रशक्ति करोन । सर्वाऽहि कुलासि बाहुन । त्याहाकारण वदतसे ॥२२६।। अहो जे असति निर्दोष । अग्निकुंडे करोनि प्रवेस । त्वरे जावे स्वास्पदास । भय त्याहिस क्वचिन्नसे ॥२२७॥ जो असे आमुचा चोर । त्यान्हे विश उत्रोनि सत्वर । जिवंत करावा नरेश्वर । न तरि लौकर दीप द्यावे ॥२२८॥ तत्कथिल्याप्रमाणे करोनि । सर्वे गेले निजस्थानि । श्रीभुतिचर राहिला बैसोनि । महामानि महाक्रुधि ॥२२९॥ तदा मंत्रवादि वदे त्यासी । तूं येकला का रे बैसलासी । काढोनि घेइ निजजहरासि । न तरि प्रवेसी चाग्निकुंडे ॥२३०॥ तो वदे मी अगंधनकुलि । जन्मलो असो महाबलि । कृतकार्यासि न मिटलि । शरीर होळि होय जरि ।।२३१।।
३०. सर्प.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org