________________
८२ : आराधना-कथाकोष
माते कर्माचि विचित्र गति । म्या कथिलि तुजप्रति । त्वा जावोनि ऐसे रीति । त्यासि निगुति संबोधिजे ॥२६५।। हे वाक्य ऐकोनि त्वत्सुत । जानोनि संसार दुःखान्त । जिनधर्म करील अंगीकृत । अज्ञानदशात सांडोनिया ॥२६६॥ मुनिवाक्य ऐकोनि सार । पुन्हा करोनि नमस्कार । नृपासन्निध जावोनि सत्वर । दुन्होनि पुत्र पाहिला ॥२६७॥ तेन्हे पाहोनिया जननि । उठल्या पल्यंका वरोनि । नमस्कार केला तत्क्षणि । मस्तक चरणि ठेवोनिया ॥२६८॥ मग योग्य स्थानि बैसलि । पुत्रास संबोधु लागलि । जैसी युक्ति मुनिने कथिलि । भासु लागली त्यापरि ॥२६९॥ म्हणे पुत्रा आइक मद्वचन । त्वत् पिता जो सींहसेन । मेला सर्पडंस होऊन । आर्तध्यान करोनिया ॥२६९ अ॥ तो मरोनि सल्लकिवनात । गजेंद्र झाला माहांत । मुनिसन्निध घेवोनि व्रत । मूलगुणसहित वसुविध ॥२७०॥ तो सर्प मरोनि त्याचि वनि । जन्मला कुर्कुट सर्पयोनि । दीर्घकाया पावोनि रौद्रध्यानि । सदा जीवाजोनि भक्षिति ॥२७१॥ एके दिवशी तो करी" । तृषाक्रांत होवोनि शरीरी । जल प्याव्या गेला नदीतिरि । चिखलाभीतरि तो रुतला ॥२७२॥ निघायाचि नसे शक्ति । तो सर्प यवोनि दुर्मति । पुन्हा भक्षिले गजाप्रति । पापमति करोनिया ।।२७३॥ महदुपसर्ग पाहोनि । सकलसन्यास घेऊनि । समाधिमृत्यु साधोनि । स्वर्गि जावोनि देव झाला ॥२७४॥
३८. हत्ती.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org