________________
३६२]
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
तसेच गोम्मटसार कर्मकाण्ड वगैरे सारख्या ग्रंथांचा अनुवाद करून एक आदर्श पायंडा घालून दिला. त्यांच्या शिष्यवर्गातील कित्येक आर्यिका, ब्रह्मचारिणी आपल्या योग्यतेनुसार ठिकठिकाणी धर्मप्रचारामध्ये संलग्न आहेत.
माताजींची साहित्यिक कामगिरी दृढ संकल्प असला की प्रत्येक कार्य अवश्य यशस्वी होते. ज्याप्रमाणे माताजी आदर्श शिष्यवर्ग निर्माण करण्यांत पूर्ण यशस्वी झाल्या, त्याचप्रमाणे उत्तम साहित्य निर्मितीमध्येही त्यांना सफलताप्राप्त झाली.
चालू शतकांत कुठल्याही जैन महिलाने केव्हाही एवढी साहित्य निर्मिती केली नाही परंतु पू० ज्ञानमती माताजींनी लेखनास प्रारंभ केला तेंव्हा पासून आजपर्यंत जवळ जवळ १५० ग्रंथांची रचना केली. शेकडो संस्कृत स्तुती रचल्या. अष्टसहस्त्री सारख्या कलिष्ट ग्रंथांचे हिंदीमध्ये अनुवाद केला. अध्यात्मग्रंथ नियमसारवर "स्याद्वाद चंद्रिका" नांवाची संस्कृत टीका लिहिली. बालकांच्यासाठी "बालविकास" या पुस्तकांचे चार भाग लिहिले. कादंबरी शैलीत अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या जवळ जवळ शंभर ग्रंथांच्या लांखो आवृत्ति निघाल्या आहेत.
निवृत्तोमार्गावर राहून देखिल त्यांनी भक्ति मार्गाता कमी लेखले नाही. त्याचे फल स्वरूप म्हणजेच आज भारतभर जिकडे तिकडे इंद्रध्वज विधान, कल्पद्रुम विधान साजरे केले जात असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे, सर्वतोभद्र महाविधान, तीन लोक विधान, त्रैलोक विधान, तीस चौबीसी तसेच पंचमेरु विधान वगैरेंची विधीपूर्वक पूजाअर्चा माताजींनी पुस्तकरूपाने लिहून ठेवलेले आहे. भक्तीमार्गाचा आदर न करणारे देखिल ही विधाने ऐकून भक्तीमय होऊन जातात.
भक्तीरसांत आकंठ बुडून काही क्षणांकरतां का होईना निजआत्म्यामध्ये लीन होवून जातात. धर्माचे गुढातील गूढ रहस्य या विधानांच्या जयमालामध्ये विदित केले आहे. आत्मरसिक मुमुक्षु जीवाला यातील कुठल्याही एका विधानाचे पुस्तक, चारी अनुयोगाचा अभ्यास करण्यास पुरेसे आहे.
याप्रमाणे पू० ज्ञानमती माताजीनी आपल्या जीवनांत साहित्य सृजनाचे नविन कार्य केले. कित्येक आर्यिकानी त्यांचे अनुसरण करीत ग्रंथ निर्मिती करण्यात आपले पाऊन पुढे टाकले. खरोखर हा स्त्री जातीचा गौरवच समजला पाहिजे.
नारी जीवनास जे समजती केवळ मधुरस । कोमल फुला समान त्या, कशा सहतील तप त्यागास । योगाभ्यासी त्या, कधी करतील को नराशी बरोबरी । अशानी ज्ञानमतीजींचे जीवन पहावे निरखुनी ।
जंबुद्वीप निर्माण व ज्ञानज्योती प्रवर्तन सन् १९६५ मध्ये आर्यिका ज्ञानमती माताजीनी, ५ आर्यिकासहित आपला चातुर्मास कर्नाटक प्रांतातील श्रवणबेळगोळ मध्ये केला. तेथील भगवान बाहुबलींची प्रचंड मूर्ती सर्वदूर प्रसिद्ध आहेच. त्या वीतरागी छबीला हृदयांतरी स्थापन करून, १५ दिषणाकरितां मौन धारण करून, विंध्यगिरी पर्वतावर, भगवंताच्या चरणाशी पू० माताजीनी ध्यान साधना केली. एका रात्री ध्यानमग्न अवस्थेत संपूर्ण जंबुद्विपाचे दर्शन घडले. अकृत्रिम चैत्यालयाची वंदना झाली. खरोखर अशी रचना अस्तित्वात आहे का? कां उगीचच आभास झाला माताजीनी ध्यान समाप्तीनंतर सर्प शास्त्रे धुंडाळली, तेंव्हा करणानुयोगाच्या त्रिलोकसार तसेच तिलोयपण्णन्ति मध्ये, ध्यानावस्थेत पाहिलेली जंबुद्वीप रचना जशीच्या तशी आढळली. माताजींच्या प्रसन्नतेला पारावार उरता नाही. कारण ख-या अनि त्यांची ध्यान-साधना आज सार्थक झाली.
या सार्थकतेच्या पाठीशी ध्यानाची एकाग्रता, पूर्वभवाचे संस्कार, भ० बाहुबलींची देन, या त्रयीची शक्ती असली पाहीजे. यापूर्वी माताजीना असा विकल्प कधीच आला नव्हता. माताजींच्या मुखकमलांतून जंबुद्वीपाच्या रचनेचे विस्तृत वर्णन ऐकून सर्वप्रथम श्रवणबेळगोळचे पीठाधीश भट्टारक चारूकीर्ति महाराजांनी अतिशय आनंद व्यक्त केला. या रचनेला साकार रूप पायचे ठरले. कोणत्या ठिकाणी याची निर्मिती करायची यासाठी बरीच स्थाने सुचविली गेली. परंतु होणारे टळत नाही. माताजीना इकडील कुठलीच स्थाने भवती नाहीत. अखेर त्यांनी उत्तरप्रांतीहस्तिनापूर येथे १९७५ मध्ये "दिगंबर जैन त्रिलोक शोध संस्थान" यांच्यानांवाने एक जमीन खरेदी केली, आणि निर्माण कार्यास प्रारंभ केला. पहिल्या टप्यांत ८४ फूट उंचीच्चया सुमेरु पर्वताचे काम १९७९ मध्ये पूर्ण झाले. त्यातील १६ जिन मंदिराची पंचकल्याणक प्रतिष्ठा २९ एप्रिल ते ३ मे १९७९ पर्यंत संपन्न झाली. सुमेरु पर्वत पहाण्यासाठी अजैन सुद्धा यैवु लागले. कुतुबमिनार चढावा तसा गंमत म्हणून मेरु पर्वत चढतात. परंतु वर गेल्यानंतर जिनेंद्र भगवंताचे दर्शन घडताच आपोआप नतमस्तक होवून जातात. ज्ञानमती माताजींच्या तपस्येचे, आत्मिक बलाचा येवढा प्रभाव होता की फक्त ६ वर्षाच्या अल्पावधित संपूर्ण जंबुद्वीपाची रचना निर्माण केली गेली. ____ याच अवधित ४ जून १९८२ मध्ये, पू० माताजींच्या प्रेरणेने प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधीनी, लालकिल्याच्या मैदानातून “जंबुद्वीप ज्ञानज्योतीचे" प्रवर्तन केले. या जंबुद्वीप ज्ञानज्योतीने १०४५ दिवसायपर्यत भारतभर परिभ्रमण केले. आपल्या या यात्राकाळांत जंबुद्वीप, तसेच भ० महावीरांचा सिद्धांत,
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org