________________
गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ
[३६३
यांचा भरपूर प्रसार, व प्रचार केला, शेवटी २८ एप्रिल १९८५ मध्ये हस्तिनापूर येथे या यात्रेचा समापन समारोह मोठया थाटांत झाला. त्यावेळी संरक्षणमंत्री पी०वी० नरसिंहराव तसेच संसद सदस्य जे०के० जैन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ज्ञानज्योतीची अखंड स्थापना केली. ही ज्योत जणू प्रत्येक प्राण्याला अहर्निश ज्ञानाचा संदेश देत आहे.
याचवेळी जंबुद्वीपामधील सर्व जिनबिंबाची प्राणप्रतिष्ठा २८ एप्रिल ते २ मे १९८५ पर्यंत संपन्न झाली. "हस्तिनापूरनगरी" एकेकाळी जी राजधानी होती तिथे आता भ० शांतिनाथांचा तीर्थकाल नांदत असल्याप्रमाणे वाटते. मध्यकाळांत "हस्तिनापूरचे" महत्त्व पुराणशास्त्रापर्यंतच सीमित होते. या भूमीकडे सर्वाचे दुर्लभ झाले होते तिचे महत्त्व कमी झाले होते. आता ज्ञानमती माताजींचे पावन चरण या भूमीवर पडले आणि हिचे भाग्यच पालटले. एका दशकाच्या अल्पावधीत उन्नतीच्या शिखरावर ही नगरी जावून बसली, कविवर पानतराय ऐकेक ठिकाणी म्हणतातच की
गुरु की महिमा वरणी न जाय, गुरु नाम जपो मन वचन काय। पू० माताजींच्या चरणस्पर्शन येथील माती चंदन बनली, मूक झालेली वीणा पुनः झंकारू लागली.
अरे ही ती पुण्यूमी आहे, जिथे भ० वृषभदेवाना राजा श्रेयांसाने पहिल्यांदा इक्षुरसाचा आहार दिला, आणि स्वप्नांत सुमेरु पर्वत पाहिला. कदाचित यासाठीच सुमेरु पर्वताचे निर्माण या पवित्र स्थळी झाले असावे. कितीतरी महत्त्वपूर्ण घटनांचा इतिहास या भूमीने पाहिला आहे. रक्षाबंधन पर्व महाभारताची कथा, मनोवतीच्या दर्शन प्रतिज्ञेचा इतिहास, द्रौपदीचे शील महत्त्व, राजा अशोक आणि रोहिणीचा संबंध, अभिनंदन आदी पाचशे मुनींवर झालेला उपसर्ग, गजकुमार मुनींचा उपसर्ग, भ० शांतिनाथ, भ० कुंथुनाथ, अरहनाथ यांचे चार चार कल्याणिकें, हे सर्व पहाण्याचे अनुभवण्याचे भाग्य येथल्या मातीला प्राप्त झालेले आहे. अशा या परम पावन भूमीचा पुनरुद्धार, एक परमतपस्विनी, गणिनी आर्यिकारत्न ज्ञानमती माताजीने केला.
निंदा प्रशंसे पासून, अलिप्त, आत्महित व जनहित या भावनेने हृदय ओतप्रेत भरलेले आहे, अशा या रत्नमय साधनेमध्ये मग्न असणा-या माताजींच्या जवळ रोज कितीतरी लोक येतात. आपले दुःख त्यांच्या चरणाशी ठेवून त्यांच्याकडून शांती घेवून जातात.
पूज्य माताजींची दैनिक चर्या कर्मभूमीमध्ये सूर्य व चंद्रामुळे काळाची, दिवस व रात्र यामध्ये विभागणी झालेली आहे. येथिल निसर्गाला तेच अनुकुल आहे. मानवप्राणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत जीवनाशी संघर्ष करीत असतो. थकून भागून रात्री निद्रेच्या कुशीत झोपून जातो. सकाळी उठल्याबरोबर त्याच समस्या पुनः मागे. याच क्रमाने आयुष्याची ५०/१०० वर्ष व्यवतीत होवून जातात.
या क्षणिक वीनश्वर, अल्पकालीन जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लावण्याचे, त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्याचे महान कार्य फक्त महापुरुषच करतात.
पू० आर्यिका ज्ञानमती माताजाही त्या महापुरुषामधील एक आहेत, ज्यांनी सन्१९५२ मध्ये गृहत्याग करून आज ४० वर्ष महान साधना करून महान साधकाच्या उच्चकोटीत त्या विराजमान झालेल्या आहेत. प्रातःकालापासून रात्रीपर्यंतचा त्यांचा प्रत्येक क्षण अमूल्य असतो.
या प्रमाणे पू० गणिनी आर्यिकारत्न ज्ञानमती माताजींची जीवन कहाणी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. या पुस्तिकेचे वाचकवृद माताजींच्या जीवनवृत्तापासून लाभ घेतील, तसेच हस्तिनापूरला येवून साक्षात माताजींचे दर्शन घेवून त्यांच्या अमर कृतींची वंदना करून धर्मलाभ घेतील अशी मी आशा व्यक्त करते.
श्री वीरके समक्सतिमे चंदना थी गणिनी बनीं जिनचरण जगवंदना थी । गणिनी वही पद्विभूषित को नमूं मे श्रीमत ज्ञानमती को नित ही नम मैं ।
"इत्यालम्"
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org