________________
३६०]
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
__एक दिवस रात्री ध्यान करीत असताना एकाएकी तेजोमय प्रकाश पसरला. तेजःपुंज अशी अकृत्रिम चैत्यालयाची रचना डोळयासमोर दिसू लागली. उत्तुंग सुमेरु पर्वत, गंगा, सिंधु आदि नद्या विदेह क्षेत्र वगैरे कितीतरी रचनाप्रत्यक्ष डोळयापुढे उभ्या राहिल्या. जणु कुठल्यातरी सिद्धीचा तो साक्षात्कार होता. हे अलौकिक दृश्य पाहून माताजींना अपूर्व आनंद झाला. प्रातःकाली खाली येऊन भरा भरा ग्रंथ उघडून काही तरी शोधु लागल्या. निलोय पण्णति त्रिलोकसार या ग्रंथांत वर्णन केलेली लोक रचना व त्यांनी रात्री पाहिलेले दृश्य जसेच्या तसे होते. हे पाहून त्यांच्या प्रसन्नतेला पारावार राहिला नाही. आता तर प्रतिदिन त्याच अकृत्रिम चैत्यालयाचे वंदना रूपाने ध्यान सुरू झाले...
या संस्थानविचय धर्मध्यानाची समाप्ती झाल्यानंतर माताजींनी आपले मौन सोडले. आपल्या शिष्यगणांना काय घडले ते सांगितले. माताजींना प्रत्यक्ष जंबुद्वीपाचे दर्शन ध्यानांत झाले हेपाहून सा-यांनाच आनंद झाला. ज्यांनी पू० माताजींच्या मुखातून हया लोकाचे अभूतपूर्व वर्णन ऐकले, ते म्हणाले या धरतीवर या रचनेला मूर्तरूप दिलेच पाहिजे.
जंबुद्वीप आदि अकृत्रिम चैत्यालयाचे वर्णन करणानुयोगांत २००० वर्षापूर्वीच लिहून ठेवले आहे. परंतु तिकडे म्हणावे तसे कुणाचे लक्ष गेले नाही. भारतात अनेक ठिकाणी नंदीश्वरदीप, समवशरण इत्यादिंची रचना केली गेली. परंतु जंबुद्वीपाला साकार करून जनमानसापर्यंत तिचा परिचय करून देण्याचे श्रेय पु० जानमती माताजींच्याकडेच जाते. दक्षिनेत ध्यानावस्थेत त्यानी जंबुद्वीपाची रचना पाहिली. पण त्याला मूर्तस्वरूप मात्र उत्तरेत मिळाले. ज्याप्रमाणे भ० ाहुबलीच्या दर्शनासाठी भारतातील सारे लोग श्रवणबेळगोळ येथे येतात त्याचप्रमाणे उत्तयरेतील जंबुद्वीपाचे दर्शन घेण्यासाठी सारे भारतवासी हस्तिनापुरला येतात.
एक वेळ अशी होती की हस्तिनापूरच्या भयानक जंगलात दिवसा देखिल जाण्यास लोक साहस करीत नसत. तेथेच आज मध्यरात्री देखिल ते निर्भयतेने खुषाल रहतात. हा पू० ज्ञानमती माताजींच्या तपस्येचाच प्रभाव आहे. जंबुद्वीप निर्माण करतेवेळी कित्येकवेळा विषारी साप निघाले. परंतु कोणालाही त्यांच्यापासून इजा झाली नाही. काम करण्या कारागिरानाही सदैव अंहिसेचे काटेकोरवणे पालन करण्याविषयी निक्षून सांगितले होते. त्यामुळे त्यानीहीकधी साप, विंचू आदिची हत्त्या केली नाही.
एकदा पू० माताजी आपल्या वसतिकेत [रत्नत्रय निलय] संध्यासमयी प्रवेश करीत होत्या, पहातो तो त्यांच्या पायाशी, एक इंचावरच एक काळा सर्प फणा काढून पसरला होता. आम्हीतर घाबरून पळू लागलो. परंतु माताजी शांतपणे धीर देत म्हणाल्या "घाबरू नका. हा सर्प कुणालाही त्रास देणार नाही." असे म्हणता क्षणीच तोसर्प सावकाशपणे आपल्या मार्गाने निघून गेला.
विंचवाचे विषही चढले नाही सन् १९७२ मधली गोष्ट. माताजींचा संघ राजस्थानातून दिल्लीकडे चालला होता. संध्याकाळची वेळ झाली म्हणून वाटेतल्या एका गावातच संघाचा मुक्काम पडला. गावातील एका घरात सर्वाची रहाण्याची व्यवस्था केली होती. बरोबर ब्र० मोतीचंदजी आणि आम्ही ७/८ ब्रह्मचारिणी होतो.
माताजीना मौन होते. त्या झोपल्या होत्या. तेवढयात पायाला काहीतरी जोरात चावल्याचे त्याना जाणवले. आम्ही टॉर्च लावून पाहिले तर एक काळा विंचू त्यांच्या पाटाजवळ होता. लोकानी लगेच विंचवाला पकडले आणि बाहेर नेऊन सोडले. आता सर्वाना काळजी लागली. माताजीना विंचवाचे विष चढले तर काय होईल? त्या लहान गावात कसलीही सोय नव्हती. काही करता येत नव्हते. मग आम्ही सर्वानी णमोकार मंत्राचा जाप घायला सुरवात केली. माताजीनीही काहीवेळ ध्यान केले आणि त्या शांपणे झोपल्या. आम्हाला काही झोप आली नाही. सकाळी उठून पहातो तो माताजींची तब्येत एकदम छान होती. रात्री त्याना विषारी विंचू चावला हे सांगूनही कुणाला खरे वाटले नसते. कठहणे, कुंथणे, दुखणे वगैरे कसलाही त्रास नव्हता. नेहेमीप्रमाणे पुढे जाण्यासाठी त्यानी विहार केला. त्यांचा त्याग, तपस्या, कडक चर्या यांचाच हा चमत्कार होय.
गेल्यावर्षों १९८७ मध्ये एक वृद्ध ब्रह्मचारिणीजी हस्तिनापूरला आली. ती कट्टर मुनीभक्त होती. साधु लोकाना आहारदान देण्यांत ती स्वतःला धन्य समजत असे. हस्तिनापूरला आल्यावरही तिने चौका लावला. असेच काही दिवस गेले. एक दिवस ती आजारी पडली. दोन्ही पाय इतके सुजले की तिला हिंडणे फिरणे मुश्किल झाले. तिने मला बोलविणे आणि म्हणाली "मला ज्ञानमती माताजींची याक्षणी अंगावर नेसलेली साडी मला आणून दे.
तिची दुरावस्था पाहिली. मी चटकन डठले. माताजींच्याकडे गेले. त्याना दुसरी साडी नेसायला दिली आणि त्यांची नेसूची साडी घेवून ब्रह्मचारिणीला दिली. दुस-या दिवशी तीच साडी नेसून ती ब्रह्मचारिणी स्वतःच्या पायाने चालत माताजींच्या जवळ आली. त्याना वंदन करून मोठया भक्तीभावेने गद्गद्लेल्या स्वरांत म्हणाली "या माताजी तर आजच्या काळातील "विशल्या" आहेत. यांच्या शरीराने स्पर्श केलेली साडी नेसले तर माझा आजार कुठल्याकुठे पळाला. मला अगदी बरे वाटू लागले.
नंतर तिने अत्यंत श्रद्धेने माताजीना नवीन पिछी दिली आणि त्यांची जुनी पिछी प्रसाद म्हणून घेतली व स्वतःला ती धन्य मानू लागली. चतुर्थकालातील साधुंचे संहनन उत्कृष्ट होते. त्यांची, त्यामुळे तपस्याही अत्यंत निर्दोष परमोत्कृष्ट, जाज्वल्य अशी होती. कठोरतील कठोर तपस्या
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org