SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 421
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ मंत्र व यंत्र देवून त्याचे श्रद्धापूर्वक अनुष्ठान करण्यास सांगितले. किरणदेवीने घरी येऊन अनुष्ठानास प्रारंभ केला. पुढच्याच महिन्यांत तिचे पत्र आले. "आता धनेन्द्राच्या डोळयांत सुधारणा होऊ लागली आहे. हळू हळू त्याला दिसुही लागले आहे. तिचे पत्र वाचून आम्हा सर्वानाच समाधान वाटले. १५ जून १९८८ रोजी किरणदेवी धनेंद्राला घेऊन माताजींच्या दर्शनार्थ पुनः हस्तिनापूरला आली. काय घडले? कसे घडले? हे माताजींना सविस्तर निवेदन केले. अत्यंत भक्तीभावाने आपल्या मुलाला माताजींच्या चरणावर घातले. माताजींनी आपली पिछी त्याच्या मस्तकावर ठेऊन मंगल आशिर्वाद दिला. किरणदेवी कृतार्थ झाली. भावनावेगाने तिचे मन भरून गेले होते. त्या भरांत तिने १५ ऑगस्ट १९८८ ते २४ ऑगस्ट पर्यत इंद्रध्वज मंडल विधान करण्याचा संकल्प केला. [३५९ अशी एक दोन किरकोळ उदाहरणे मी समक्ष पाहिलेली आपणांस सांगितली आहेत. असे कितीतरी लहान मोठे चमत्कार माताजींच्या तपस्येच्या प्रभावाने घडलेले आहेत. सारेच कांही लेखनीबद्ध करू शकत नाही. गुरुभक्तीचा महिमा अगाध आहे. हेच यावरून दिसून येते. म्हंटलेच आहे की, "गुरुभक्ती सती मुक्तयै, क्षुद्रं किं वा न साधयेत." अर्थात् गुरुभक्ती, गुरुवचन यावरची अचल श्रद्धा मुक्तीला प्राप्त करून देते. मग या क्षुद्र गोष्टींची काय कथा । ० बालसती, पू० आर्थिका ज्ञानमती माताजींच्या ३६ वर्षाच्या तपस्येमध्ये महान शक्ती असणारच. आपल्या शक्तीचा उपयोग करुणा भावनेने मानव मात्रांचे दुःख दूर करण्यासाठीच केला. प्रकरण ६ सन् १९६४ मधील गोष्ट.. कलकत्ता येथील चातुर्मास संपवून आपल्या संपासहित विहार करीत पू० माताजी आंध्रप्रदेशांत आल्या. हैद्राबाद येथे त्यांचा चातुर्मास झाला. या चातुर्मासांत माताजींना संग्रहणीच्या आचाराने गाठले. माताजींचे प्रकृति स्वास्थ्य अत्यंत बिघडले. खूप अशक्तपणा आला होता. जगताता कीं मरतात अशी अवस्था निर्माण झाली. त्यावेळी संघात पू० ज्ञानमती माताजींची धाकटी बहिण अ० मनोवती होत्या. त्यांनीच माताजींना संघसहित श्री० सम्मेदशिखरजीची यात्रा अथक परिश्रमपूर्वक करून आणली होती. या चातुर्मासांत त्या पू० माताजींच्या हस्ते क्षुल्लिकेची दीक्षा ग्रहण करणार होत्या. माताजींची परिस्थिती तर गंभीर होती. दीक्षा समारोह कसा होणार याची सर्वाना चिंता पडली. परंतु त्या स्थितीतही त्यांनी दीक्षेचा मुहूर्त काढला. त्यांची इच्छाशक्ती आत्मशक्ती जबर होती. श्रावण शुक्ल सप्तमीच्या [ मोक्षसप्तमी ] शुभमुहुर्तावर माताजी उठून बसल्या अणि अत्यंत उत्साहाने विशाल जनसमुदायाबरोबर ब्र० मनोवतीला स्वहस्ते क्षुल्लिकेची दीक्षा प्रदान केली. आचार्यश्री शिवसागरजी महाराजांच्या आज्ञेनुसार दीक्षेचे सर्व संस्कार माताजींनी स्वतः जातीने केले. दीक्षेनंतर मनोवतीचे नांव ० अभयमती ठेवण्यांत आले. तेव्हापासून हैद्राबादमधले लोक गंमतीने म्हूण लागले की जर कान माताजींना कुठल्याही आजारातून बरे करायचे असेल तर कुणाचा तरी दीक्षा समारोह करावा म्हणजे त्या औषधावाचून ठीक होतील. मुमुक्षु जीवाना त्या नेहमीच वैराग्यपूर्ण शब्दांत संबोधन करीत आणि मोक्षमार्गाला लावीत. स्वतःची तब्येत बरी नसली तरी कधी त्यात खंड पडला नाही हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. आपल्या जीवनांत अनेक स्त्री पुरुषाना कल्याणमार्गाला लावण्यांत त्या यशस्वी झाल्या आहेत. दक्षिणेतील जंबुद्वीप उत्तरेत हैद्राबाद येथील चातुमांस संपल्यानंतर माताजी कर्नाटक प्रांती गेल्या. तेथे श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबलींच्या पवित्र चरण सानिध्यांत १९६५ चा चातुर्मास झाला. सिद्धीची प्राप्ती होण्यासाठी साधनेच्या पाय-या ओलांडाव्या लागतात. कार्यसिद्धसाठी तन्मय होऊन कोणी कठोर साधना करील तर त्याला यश मिळाल्या शिवाय रहाणार नाही. डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचे असेल तर बरीच वर्षे परिश्रमपूर्वक अभ्यास करावा लागतो तेंव्हा कुठे अशी पदे प्राप्त होतात. तद्वत मोक्षसाधना करण्यासाठीही कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. अर्जुनाला धनुर्विद्या साध्य करताना पक्ष्याच्या डोळयातील फक्त बाहुली दिसत होती. इतर कांहीही दिसत नव्हते. त्याचप्रमाणे मोक्षार्थिना सर्व गोष्टीकडून मन हटवून केवळ वीतरागतेची आराधना केली पाहिजे. Jain Educationa International सर्व साधनेत ध्यान साधना मुख्य आहे. तसे तर संसारात राहून आम्ही प्रतिक्षण ध्यानक करीत असतो. ध्यान चार प्रकारचे आहे. आर्त, रौद्र, धर्म आणि शुक्लध्यान, आर्त, रौद्र, ध्यान या जीवाला सदासर्वदाच होत असते. किंबहूना ही दोन ध्यानेच संसाराला कारणीभूत आहेत. या दोन्ही ध्यानाचा त्याग करून पू० माताजींनी धर्मध्यानावर आपली लक्ष केंद्रित केले. कारण शुक्लध्यान श्रावकांनाच काय परंतु त्यागी मुनींनाही या कालांत होणे असंभव आहे. म्हणून धर्मध्यानच वृद्धींगत करून त्यात आत्मानंदाचा रसस्वाद घेतला पाहिजे. चातुर्मासांतर्गत माताजींनी याच ध्यानाचा आश्रय घेतला. १५ दिवस अखंड मौन धारण करून भ० बाहुबलीच्या चरणाशी त्या ध्यानरत राहिल्या. त्यांच्या एक शिष्या आर्यिका पदमावती फक्त त्यांच्याजवळ होत्या. बाकीचा संघ पहाडाखाली थांबला होता. केवळ आहारासाठी त्या खाली येत होत्या. पर्वतावरच रात्री थोडावेळ झोप घेत. बाकीचा सर्व समय ध्यान साधना करीत. For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.012075
Book TitleAryikaratna Gyanmati Abhivandan Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorRavindra Jain
PublisherDigambar Jain Trilok Shodh Sansthan
Publication Year1992
Total Pages822
LanguageHindi
ClassificationSmruti_Granth
File Size26 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy