________________
३५६]
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
अध्यापनामध्ये वेळ जावू लागला. कुं० प्रभावती व सौ० सोनूबाई माताजींच्या सान्निध्यात राहून धर्माचे मर्म जाणण्यांत प्रगल्भ झाल्या. हळूहळू त्यांच्याही हृदयांत वैराग्याचे तेजस्वी अंकूर फुटले.
विरागींच्या सहवासात रात्री क्षणभरासाठी का होईना विरागी होतो. या दोघींचे तर मुळचेच परिणाम उत्तम होते. प्रभावतीचे वैराग्य पाहून क्षु० वीरमती माताजी तिला म्हणाल्या प्रभावती म्हणाली "अम्मा। मला स्वतंत्र जीवन जगणे आवडते. आपल्याजवळच रहाण्याची माझी इच्छा आहे. यापेक्षा अधिक प्रभावतीला सांगता आले नाही. अशा रितीने कुमारी बालसतीक्षु० वीरमती माताजीना प्रथम शिष्या कुमारी कन्याच मिळाली. क्षु० विशालमती माताजींच्या आज्ञेनुसार दीपावलीच्या मंगल प्रभाती प्रभावतीला आजीवन ब्रह्मचर्यव्रतपूर्वक दहावी प्रतिमा प्रदान केली. त्याचवेळी सौ० सोनूबाईनी आपल्या पतीच्या आज्ञेने सहावी प्रतिमा धारण केली.
चातुर्मास संपला. क्षु० वीरमती माताजीना आता "आर्यिका" पदाची उत्कट ओढ लागली. त्या ओढीनेच क्षु० विशालमती माताजीनी म्हसवड येथेच ठेवून बरोबर प्रभावती व सौ० सोनूबाई याना घेवून त्या जयपूरला आल्या.
जयपूरला आचार्यश्री वीरसागर महाराजाचा ससंघ निवास होता. जयपूरला गेल्यानंतर क्षु० वीरमती माताजीनी आपल्या दोन्ही शिष्ये सहित आचार्यश्रींचे दर्शन घेतले, आणि आ० शांतिसागरजींची आज्ञा सांगून आर्यिका दीक्षा देण्याची विनंती केली.
आचार्यश्री म्हणाले "येवयांत घाई करू नका. थोड यांचा संघात रहा. संघातील साधु, साध्वींचा परिचय करून घ्या. नंतर दीक्षेच पाहू. माताजीनी गुरुदेवाची आज्ञा प्रमाण मानली. त्या संघात सवर आर्यिकेच्या बरोबर राहू लागल्या. संघामध्ये असलेल्या ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आर्यिकानी क्षु० वीरमती माताजीच्या ज्ञानाची, चर्येची, स्वभावाची परिक्षा घेतली. त्यात त्या पूर्णपणे उतरल्या.
क्षु० वीरमतीमाताजीना लवकरात लवकर आर्यिकेच दीक्षा ध्यायची होतो. परन्तु आचार्यश्रींच्या आदेशानुसार त्याना चार महिने वाट पहावी लागली. शेवटी संघ जयपूरहून विहार करून माधोराजपूर येथे आला.
या अवधीत आचार्यश्रीनी देखिल माताजींची गहन ज्ञानसाधना, दीक्षेची उत्कट भावना पारखली होती. ते त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होते. माताजी वयाने लहान असुनही ज्ञानाने चारित्राने महान होत्या. त्यांचे संघातील वास्तव्य हे संघाला गौरवास्पद आहे अशी आचार्यश्रींची धारणा झाली होती.
चारित्र चक्रवर्ती आचार्यश्री शांतीसागर महाराजांचे प्रथम पट्टाधीश आचार्यश्री वीरसागरजी महाराज आपल्या चतुर्विध संघासहित माधोराजपूर मध्ये विराजित होते. सारे भक्तगत, साधनेमध्ये रत असलेल्या साधु साध्वींच्या दर्शनाने कृतकृत्य होते होते.
इकडे क्षु० वीरमती माताजींच्या उत्कट भावलहरी असीमित झाल्या. “आर्यिका" दीक्षेसाठी त्या बेचैन झाल्या. पुनः एक दिवस त्या आचार्यश्रींच्या चरणाशी गेल्या, आणि मोठया विनयाने प्रार्थना केली. "हे गुरुदेव ! मला आता लवकरात लवकर आर्यिका दीक्षा प्रदान करावी". महाराजजींचे माताजींच्या बाबतीत आता पूर्ण समाधान झाले होते. "आर्यिका" दीक्षा घायला काही हरकत नाही असा त्यांच्या मनाने कौल दिला. ताबडतोब त्यानी ब्र० सुरजमलजीना शुभमुहुर्त काढायला सांगितला. वैशाख शुद्ध द्वितीयेला "आर्यिका" दीक्षा समारोहाची घोषणा झाली.
दीक्षेचा शुभदिन उगवला. आज आपल्या अंतिम लक्ष्याची सिद्धी होणार असल्याने ९० वीरमती माताजी अतीव प्रसन्न होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची शिष्या ब्र० कु० प्रभावती ही क्षुल्लिकेची दीक्षा घेणार होती.
दिवसाच्या मध्यान्हीची वेळ आचार्यश्रीनी वीरमती माताजींच्या मस्तकावर मुनीदीक्षेचे समस्त संस्कार केले. नवीन पिंछी कमंडूल प्रदान करून "आर्यिका ज्ञानमती" असे नामाभिधान केले. त्याचवेळी कु० प्रभातीला क्षुल्लिकेची दीक्षा देवून तिचे "जिनमती" नांव ठेवले.
आता आर्यिका ज्ञानमती माताजी संतोषाने आपल्या अध्ययन, अध्यापन, ध्यानसाधना यात्त रत राहू लागल्या. माताजींचा ज्ञान, ध्यानाकडे असलेला तीव्र कल पाहूनच आचार्यश्रीनी त्यांचे नांव "ज्ञानमती" ठेवले. आपल्या या छोटया शिष्येला आचार्यश्री सदैव जाती ने प्रबोधन करीत. ते म्हणत, "ज्ञानमती।" तूं आपल्या नांवाकडे सतत लक्ष ठेव. त्याचा कधीही विसरपडू देवू नकोस येवढेच माझे तुला सांगणे आहे.
प्रकरण ५ चारित्र चक्रवर्ती आचार्यश्री शांतीसागरजी महाराजांच्या आदेशानुसार चालणारे त्यांचे पट्टाधीश आचार्यश्री वीरसागर महाराज आपल्या चतुर्विध संघाचे कुशलतेने संचालन करीत राजस्थानीत विहार करीत होते. श्रावकगण गुरुसहवासाचा लाभ करून घेत होते. तर साधूगण पितृतुल्य अशा महान गुरुंच्या वात्सल्यमय छत्रछाये खाली आपल्या रत्नत्रयाची साधना करीत होते.
आर्यिका ज्ञानमती आपल्या गुरुंच्या आज्ञेवरून आपल्या नांवाला अनुसरून ज्ञानगंगेत सदैव डुबत होत्या. धर्मग्रंथातील कठीणातल्या कठीण शब्दाचाही अर्थ जाणण्यात त्याना कुठलीच अडचण वाटत नव्हती. कारण "कातंत्ररूपमाला" व्याकरण शास्त्र आत्मसात केल्यामुळे मूळ पायाच त्याचा पक्का झाला होता. आपल्या शिष्यगणाला शिकवून शिकवून त्या आपले ज्ञान परिपक्व करीत होत्या. माताजी नेहेमीच म्हणायच्या- "ज्याप्रमाणे चाकूला दगडावर घासून धार तीक्ष्ण होते. आणि ज्ञानामध्ये वाढ होते. “माताजींचे हे आवडते तटव होते. म्हणूनच त्या सदैव दुस-याला शिकविण्यात तत्पर असत.
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org