SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 419
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ [३५७ विहार करीत करीत संघ जयपुरला आला. तिथे संघातल्या काही साधुनी प्रतिक्रमणाचा अर्थ शिकवण्याची माताजीना विनंती केली. माताजीनी आचार्यश्रीची आज्ञाघेवून त्याना प्रतिक्रमण अर्थासहित शिकविण्यास प्रारंभ केला. त्यांच्या विद्यार्थिगणात क्षु० सन्मतिसागरजी, क्षु० चिदानंद सागरजी [क्षुल्लकावस्थेतील आचार्य कल्प श्रुतसागरजी] क्षु० चंद्रमतीजी, क्षु० जिनमती, क्षु० पद्मावती आणि अनेक वयोवृद्ध आर्यिका सामील होते. यातच पू० माताजींनी सामायिकाची शास्त्रानुसार शास्त्रोक्त विधीही सांगितला. तोपर्यत संघात शास्त्रोक्त अशी सामायिकाची विधी [इपिथ शुद्धी करून चैत्य पंचगुरुभक्ती, समाधीभक्ती सहित] प्रचलित नव्हती. या विधीचा साधुसंघात चांगलाच प्रभाव पडला. आचार्यश्रींचे अनुशासन कडक परन्तु प्रेमळ होते. त्यांच्या शिस्तीमुळे संघात एकसुत्री पणा होता. श्री सम्मेदशिखरजीवरून याचवेळी आचार्यश्री महावीर कितीजी महाराजांचा संघ विहार करीत आचार्य देवांच्या दर्शनार्थ जयपूर येथे आला. आचार्यश्री महावीर किर्तीजी महाराज संस्कृत व्याकरण, न्याय सिद्धांत ग्रंथाचे प्रकाण्ड विद्वान होते. म्हणून आचार्यश्री वीरसागर महाराजांनी त्यांना आज्ञा केली की आपण आमच्या संघातील मुनी आर्यिकांना शिकवावे. गुरु आज्ञा शिरोधार्य मानून त्यांनी साधुना शिकविण्यास सुरूवात केली. यातच श्री ज्ञानमती माताजींनी राजवार्तिक अष्टसहस्त्री आदि ग्रंथाचे अध्ययन केले. ___ इकडे आचार्यश्री वीरसागर महाराजांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली. प्रकृति पुनः उभारी धरेना. त्यांचा अंतिमकाल निकट आल्याचे सर्वाना जाणवले. अण्वीन कृष्ण अमावस्येच्या दिवशी आचार्यश्री पद्मासनामध्ये स्थित राहून, महामंत्राच्या घोषांत समाधिस्थ झाले. सर्व संघावर दुःखाची कु-हाड कोसळली. पोरकेपणाच्या भावनेने सारा साधुगण व्याकुळ झाला. अशा दुःखित संघपरिवाराला सावरण्याचे काम महावीर किर्तीजी महाराजांनी केले. आपल्या वात्सल्यपूर्ण अमृतवाणीने त्यांचे सांत्वन केले. द्वितीय पट्टाधीश आचार्य आचार्यश्री वीरसागरजीमहाराजांच्या समाधीनंतर संघाचे आचार्यपद मुनीश्री शिवसागरजी महाराजांना प्रदान करण्यात आले. संघाचे सूत्रसंचालन त्यांच्या अनुशासना खाली होऊ लागले. आचार्यश्रींच्या संघाबरोबर यात्रा करीत करीत तीन वर्षे होऊन गेले. त्यानंतर पू० माताजींनी श्री सम्मेदशिखरजीच्या यात्रेला जाण्याची आचार्यश्रींच्या कडून आज्ञा घेतली. त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्यगण जिनमती माताजी, आदिमतिजी, पद्मावतीजी, श्रेष्ठमतीजी हे देखिल होते. तेव्हापासून आजपर्यत पू० माताजींच्या जीवनाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की या शतकात स्त्री असूनही त्यांनी अनेक अलौकीक कार्यानी आपले जीवन संपन्न केले. पू० माताजींच्या उपदेशामुळे, चर्येमुळे, जैनधर्माची प्रभावना वाढली. तसेच अनेक दुःखी लोकांच्या समस्या त्यांना मंत्रतंत्र सांगून करूणा भावनेने सोडविल्या. कितो लोकांनी त्यांच्या सिद्धीचा लाभ घेतला. याला गणतीच नाही. ही सारी उदाहरणे मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. सन् १९६३ मध्ये कलकत्ता येथे प्रथमच पू० माताजींच्या संघाचा चातुर्मास घडला. तो चातुर्मास आजही तेथील लोकांच्या चांगलाच स्मरणांत आहे. पू० माताजींची दृढता, कडक अनुशासन, आगमाविषयी कट्टरता याच्या विषयी तेथील समाजाचे मान्यवर लोक अजुनही भक्तीभावनेन बोलतात. माताजींची महानता, ज्ञानाची प्रगल्भता पाहून माताजींच्या गुणवैभवासमोर आपोआपच मस्तक नत होऊन जाते. माताजींच्या आशिर्वादाने हरविलेल्या बालकाची प्राप्ती सन् १९८३ च्या नोव्हेंबर मधली गोष्ट. एक श्रावक वीरकुमार जैन [बेलहरा, जि० सीतापूर, अवधनिवासी] हस्तिनापुरला आले. त्यांचा १८ वर्षाचा मुलगा दिलीपकुमार कुठेतरी बेपत्ता झाला होता. तसा तो जरा विक्षिप्तच होता. तरुण मुलाच्या बेपत्ता होण्याने वीरकुमार अतिशय घाबरून गेले होते. पू० माताजींनी त्यांनी सर्व कहाणी सांगितली आणि काकूळतीला येऊन विचारले, माताजी। माझा मुलगा केंव्हा आणि कुठे सापडेल? माताजी त्यांचे सांत्वन करीत म्हणाल्या, घाबरू नका. एक मंत्र देते. त्याचा सत्रालाख जाप करा. तुमचा मुलगा स्वतः होऊन चालत घरी येईल. पू. आर्यिका रत्नमती माताजीही तेथे उपस्थित होत्या. वीरकुमारजींनी त्यांचेही दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला आणि घरी निघून आले. पुत्र वियोगाने अत्यंत बेचैन झालेल्या वीरकुमारजींचे चित्र, मंत्राचा जाप देतानाही ठिकाणावर रहात नसे. मुलाच्या काळजीने त्यांचे प्राण कंठाशी येत. आपला पुत्र कुठे असेल? कशा अवस्थेत असेल? जीवंत तरी आहे की नाही या विचाराने ते व घरचे लोक व्याकुळ होऊन सारखे रडत. वीरकुमारजी प्रत्येक पोळीस ठाण्यावर जाऊन रिपोर्ट देवून आले. मुलाचातपास लागावा म्हणून प्रत्येकापुढे हात जोडले, काना कोपरा शोधून काढला. पण कुठेही त्याचा पत्ता लागला नाही. असाच एक महिना गेला. वीरकुमारजी पुनः रडत माताजींच्याकडे गेले. त्याना विनवणी करीत म्हणाले "माताजी। कांहीही करा, माझा मुलगा मला भेटवा." माताजी नम्रपणे म्हणाल्या "भाईजी। हे रडणे बंद करा. मी सांगितलेल्या मंत्राचे सधालाख जाप द्या. तुमचा मुलगा तुम्हाला नक्की मिळेल. तो जेथे आहे तिथे खुषाल आहे." Jain Educationa international For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.012075
Book TitleAryikaratna Gyanmati Abhivandan Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorRavindra Jain
PublisherDigambar Jain Trilok Shodh Sansthan
Publication Year1992
Total Pages822
LanguageHindi
ClassificationSmruti_Granth
File Size26 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy