________________
गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ
[३५५
इतिहासांत सुवर्णाक्षराने कोरण्या सारखा होता. मैनाची मनोकामना आता पुरी झाली होती. आईच्या समाधाना साठी आता तिला एक नाही तर अनेक वचने देण्यासाठी मैना तयार होती.
ती शरदपौर्णिमेचीच रात्र होती. मैना बरोबर सोळा वषारची झाली. पौर्णिमेचा बाह्य मुहुर्त साधून, माता पुत्री दोधीही सुस्नात होऊन आचार्यश्रींच्या जवळ गेले. मातेने आपण लिहिलेला स्विकृति कागद कंपित हाताने महाराजांनादिला आणि ती गद्गद्लेल्या स्वरांत म्हणाली, गुरुवर ! आपण हे पत्र सदैव गुप्त ठेवावे. महाराजांनी पत्र घेतले. वाचून आश्चर्यचकित होऊन मोहिनीदेवीकडे पाहूनागले. मोहिनीदेवीचा आतापर्यंत बांधलेला धीर गळून पडला. डोळयांत अश्रृंचा पूर दाटला. हुंदके देवून ती रडू लागली. तिची अशी स्थिती होणे स्वाभाविकच होते.
मैनाने श्रीफळ चढवून आचार्यश्रीकडून ब्रह्मचर्यव्रतरूप सातवी प्रतिमा धारण केली आणि ती गृहविरत झाली. सारे शहरवासी मैनाच्या धैर्य आणि साहसाची प्रशंसा करू लागले. शरद्पौर्णिमेचा जन्मदिवस सप्तम प्रतिमा धारण करून मैनाने साजरा केला. माता पिता छोटी भावंडे त्यावेळी हमसून हमसून रडत होती. ते करुणमय दृश्य पाहून सा-या नगरवासियांच्या डोळे ओले झाले. परंतु मैनाच्या डोळयांत पाण्याचा एक थेंबही नव्हता. मोहासक्त असलेला तिचा परिवार मैनाला आचार्यश्रींच्या चरणावर घालून जेंव्हा निघून गेला तेंव्हा तिला पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त झाल्याचा आनंद झाला. आता स्वाध्याय, अध्ययन हेच तिचे साथी, नातेवाईक होते. ब्रह्मचारिणी अवस्थेत देखिल तिची चर्या आर्यिकेसमान होती.
दीक्षेकडे वळलेले पाऊल चातुर्मास संपल्यानंतर आचार्यश्री बाराबंकी हून लखनऊ, सोनागिरी वगैरे करीत "श्री महावीरजी" येथे आले. मैनाची उत्कट भावना पाहून चत्रकृष्ण प्रतिपदेन्सठ आचार्यश्रींनीतिला क्षुल्लिकेची दीक्षा दिली. तिची वीरता पाहून “वीरमती" हे नांव तिला प्रदान केले. मैनाच्या फलतेची ही दुसरी पायरी होती.
दीक्षा घेतल्यानंतर "महावीरजी" येथेच क्षुल्लिका ब्रह्मयनी माताजींची भेट झाली. दोघी मिळून संघांत राहू लागल्या. आचार्यश्रींचा संघ वाहत्या गंगेप्रमाणे विहार करीत जनमानसाला तृप्त करीत होता. योगायोगाने संघाने पुनः उत्तरप्रदेशात पदार्पण केले. चातुर्मास जवळ आला होता. टिकैत नगरापासून ६ कि०मी० दूर असलेल्या दरियाबाद या गांवी संघाचा मुक्काम होता. टिकैतनगरीचे काही प्रमुख महानुभव आचार्यश्रीची टिकैतनगरी चातुर्मास करावा म्हणून आचार्यश्रींच्याकडे प्रार्थना करण्यासाठी गेले. मैनाचे पिताजी ही मुलीच्या मोहाने त्यात सामील होते.
आचार्यश्रीनी त्यांची विनंती कबूल केली, अशा रितीने क्षु० वीरमती माताजींचा पहिला चातुर्मास आपल्या जन्मभूमीतच झाला. चातुर्मासांत तिथे त्या सतत ध्यान अध्ययन, स्वाध्याय यातच रत असत. मातापिता येत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत. परनतु त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नसत.
सन् १९५३ मध्ये क्षुल्लिका विशालमती माताजी त्याना येवून मिळाल्या. त्या वीरमती पेक्षा मोठया होत्या. वडिलकीच्या नात्याने त्यानी क्षु० वीरमती माताजीवर मातेप्रमाणे वात्सल्याचा वर्जाव केला.
एकदा संघात बातमी आली की आचार्यश्री शांतिसागरजी महाराज कुंथलगिरी येथे यम सल्लेखना घेणार आहेत. क्षु० वीरमती माताजीना त्यांच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. आचार्यश्रीची आज्ञा घेवून क्षु० विशालमती माताजींच्या बरोबर दक्षिण भारताची यात्रा करीत त्या निघाल्या. विहार करीत म्हसवड येथे पोहोचल्या. येथे दीन्ही माताजीनी चातुर्मास केला. येथेच त्यानी कु० प्रभावती हिच्या अध्ययनास प्रारंभ केला.
चातुर्मास अंतर्गत भाद्रपदमध्ये आचार्यश्री शांतिसागर महाराजानी यम सल्लेखना घेतल्याची अचानक बातमी आली. तेंव्हा क्षु० विशालमती माताजींच्या बरोबर क्षु० वीरमती माताजी कुंथलगिरीला आल्या. त्यांच्या सोबत सौ० सोनूबाई नांवाच्या एक महिलाही होती. कालांतराने त्यानी ज्ञानमती माताजीच्या जवळच दीक्षा धारण केली. त्या आर्यिका पदमावती नांवाने प्रसिद्ध झाल्या.
कुंथलगिरीला आल्यावर माताजीनी सल्लेखनारत आचार्यश्रीचे दर्शन घेतले. सल्लेखनापूर्ण होईपर्यंत तेथेच रहाण्याचा निर्णय घेतला. सल्लेखनाच्या आधी एक दिवस क्षु० वीरमती माताजीनी आचार्यश्रींच्या जवळ प्रार्थना केली. "हे गुरुदेव ! आम्हाला संसार सागर पार करण्यासाठी आर्यिकेची दीक्षा द्यावी.
अत्यंत कोमल स्वरांत आचार्यश्री म्हणाले. "आम्ही आता दीक्षा न देण्याचा नियम केलेला आहे. आमचे शिष्य मुनी वीरसागरजी महाराज यांच्या संघात जावून त्यांच्याकडून दीक्षा ग्रहण करावी."
गुरुदेवांचे वात्सल्यापूर्व शब्द ऐकून क्षु० वीरमती माताजीना समाधान वाटले. सन् १९५५ च्या १८ सप्टेंबरला भाद्रपद शुद्ध बीजच्या दिवशी सकाळी सात वाजून ५० मिनीटानी "ॐ सिद्धाय नमः" या मंत्राचा उच्चार करीत आचार्यश्रीनी आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला. आचार्य शांतिसागरांच्या रूपाने एक आदर्श [चारित्रा] चारित्र्याचे प्रतिक अनंतात विलीन होऊन गेले. महाराजजी गेले. पण त्यांची महानता त्यांचा आदर्श, त्यांची शिकवण मागे राहिली. या आदर्शनुसार शिकवणी अनुसार जो कोणी आपला मार्ग क्रमेल, त्याला निश्चितच आचार्यश्रींची उंची गाठता येईल.
आचार्यश्रींच्या सल्खनानंतर दुःखित अंतःकरणाने दोन्ही माताजी पुनः म्हसवडला आल्या. पुनश्च रोजचा दिनक्रम सुरू झाला. अध्ययन,
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org