________________
३५४]
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
सर्व दुःखावर काळ हे मोठे औषध आहे. मैनाही काही काळाने सावरली. अंतर्यामी विरक्त चित्त असलेली मैना आपल्या भावंडावर प्रेमाचा वर्षाव करीत घरातील कामकाज पाहू लागली. त्याच वेळी सन् १९५२ चा आचार्यश्रींचा चातुर्मास ससंघ "बाराबंकी" या शहरात झाला. यावेळी घरामध्ये मोहिनीदेवी गर्भवती होती. मैनाला महाराजांच्या दर्शनाची ओढ होती. परंतु घरांत मातेला अशा अवस्थेत टाकून "बाराबंकी" येथे तिला जाता येत नव्हते.
एक दिवस आईच्या पोटांत खूप दुखु लागले. असह्य वेदना होऊ लागल्या. प्रसुति कठिण जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली. सुईणबाई पण चिंतेत पडल्या. पाई हातापाई धड हाती लागती की नाही याची सर्वाना काळजी पडली. मैना हे सर्व पहात होती. आईची परिस्थिती पाहून ती व्याकुळ झाली. तिची जिनेंद्र भगवंतावर दृढ श्रद्धा होती. ती उठली. हातात एक वाटी घेऊन त्यात शुद्ध जल घेतले. मनोभावे सहस्त्रनाम स्तोत्र म्हणु लागली. वाटीतले जल अशा रितीने मंत्रित करून मातेला पिण्यासाठी दिले.
थोडयाच वेळांत आतून आजीचा आनंदाने ओरडलेला आवाज आला. मैना थाळी वावज थाळी. तुला बहिण झाली. सुईणबाई चकित झाली. तो म्हणाली, या मुलीने कसली जादु केली आईला जल पाजविलं आणि किती सुलभतेने प्रसुति झाली. मला तर या बाईचे लक्षण ठिक दिसत नव्हते. पुनः एकदा सर्वाच्या नजरेत मैनाचे महत्व वाढले. मैनाला आपला मार्ग निष्कलंक होण्याची आशा वाटू लागली.
हिच्या प्रमाणे मौल्यवान असलेला एक एक दिवस वाया जाताना पाहून मैना तळमळत होती. आईच्या आग्रहाखातरतिला घरातच थांबावे लागेले.
काही दिवसांतच राखी पौर्णिमा आली. मोहिनीदेवीला प्रसुति होऊन बावीस दिवस झाले होते. राखी पौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर मैनाने आपल्या छोटया बहिणीचे नांव "मालती" असे ठेवले. तिच्या हातून सवर भावंडांना राखी बांधवली. घरात सर्व जण खुषीत होते. सर्वाना वाटले मैना आता घरात चांगलीच रमली. ही कांही घर सोडून जात नाही. संन्यासी होत नाही. परंतु त्यांचे हे समाधान क्षणभंगुरण ठरले. दुस-याच दिवशी मैनाने आचार्यश्रींच्या दर्शनाला जाण्याचा प्रस्ताव घरात मांडला. सर्वाना धक्काच बसला , ही कांही आपल्या निश्चयापासून हटली नाही हे त्यांच्या लक्षात आले. मातापित्यांनी तिला जाण्यासाठी विरोध केला. डोळयांत पाणी के आणले. परन्तु त्यांचे अश्रु तिला थांबविण्यास असमर्थ ठरले. मैनाने त्यांची समजूत घातली. मी फक्त दर्शनाला जात आहे असे अर्ध सत्य आश्वासन दिले.
अखेर आपला धाकटा भाऊ कैलाशचंद्र याला सोबत घेऊन ती "बाराबंकीला" गेलीच. तिथे गेल्यावर मैनाने आपला संकल्प कैलाशला सांगितला. कैलाश, मी आता घरी येणार नाही. येथेच आचार्यश्रींच्या संघात राहणार आहे.
हे ऐकून कैलाशला अत्यंत धक्का बसला. तो रडू लागला. त्याची कशीबशी समजूत घालून संध्याकाळी घरी पाठवून दिले. मैना ने आपल्या हृदयावर दगड ठेवला होता. लहान भावंडाचे प्रेम, आईवडिलांची माया, या सर्वाचा मोह तिने निग्रहाने दूर सारला होता. छोटा भाऊ रविंद्र तर तिच्याशिवाय झोपत नव्हता. झोपताना त्याला जीजीचा पदर आपल्या हातात धरून ठेवायची संवय होती. जणू काही जीजी आपल्या सोडून जाणार तर नाही याचे भय त्याच्या मनांत असावे. तो झोपेत असतानाच त्याच्या मस्तकावर प्रेमभराने शेवटचा हात फिरवून मैना निघून आली होती.
मैना घरी आली नाही म्हणून तिचे मातापिता, सर्व कुटुंबजन बाराबंकीला गेले. सांसारिक मोहामुळे तिच्यावरील प्रेमामुळे तिला वाटेल तसे अद्वातद्वा बोलू लागले, रडू लागले. त्यांचा सगळा गोंधळ पाहून मैनाला काही सुचेनासे झाले. थोडावेळ संभ्रमावस्था झाली पण लगेच तिने स्वतःला सावरले. मनाशी निश्चय करून ती उठली, मंदिरांत भेलो. जिनप्रतिमेच्या सम्मुख होऊन तिने प्रतिज्ञा केली- जोपर्यंत मला आजीवन ब्रह्मचर्य व्रत मिळणार नाही तोपर्यंत मला चतुराहाराचा त्याग आहे असे म्हणून ती तेथेच निश्चल बसली. दिवसभर गोंधळ घालून काही लोक आपआपल्या घरी निघून गेले. वातावरण बरेचसे शांत झाले. रात्री मोहिनीदेवी मंदिरात जाऊन मैनाची समजूत घालू लागल्या. नंतर एका खोलीत आऊन रात्रभर दोघी चर्चा करीत बसल्या. मैनाने युक्ती प्रयुक्तीने मातेचे मन एवढे बदलले की तिचेही मन वैराग्य भावनेने प्रभावित झाले. मैनाने अखेरचा घाव घातला. "आई। तूं जर माझी खरी आई असशील तर माझे कल्याण करण्याची मला अनुमती दे. जीवनभर तुझे उपकार मी विसरणार नाही.
मैना कुठल्याही प्रकारे आहारपणी ग्रहण करण्यास तयार होत नाही हे पाहून आईने धडधडत्या हृदयाने आपली अनुमती दिली. वडील तर मुलीच्या वियोगाच्या असहय कल्पनेनेच व्याकुळ होऊन त्यावेळी कुठे निघून गेले हे कुणालाच माहित नव्हते. मैनाला सुवर्ण क्षण असल्याचाच भास झाला. तिने लगेच एक कागद पेन्सील घेतली. आईच्या हातात देत. तिच्याकडून लेखी स्विकृती मागितली. कारण आचार्यश्रींनी आधीच कल्पना दिली होती की घरण्यांची अनुमती असल्याखेरीज मी व्रत देणार नाही.
माता मोहिनीदेवीने मैनाच्या सांगण्यानुसार लिहिण्यास सुरूवात केली. डोळया तून अश्रु वहात होते. हात कापत होते. तरी देखील ती लिहित होती. "पूज्य महाराजजी। माझी कन्या मैना हिला, तिला पाहिजे ते व्रत द्यावे. आपल्या व्रताचे ती दृढतेने पालन करील याचा मला पूर्ण विश्वास आहे.
प्रकरण ४ या शतकांत कुमारी मुलींना मोक्षमार्ग खुला करण्यासाठी आपल्या प्रथम कन्येला मोहिनीदेवी ने समर्पित करून जणु शुभारंभ केला. मैनानंतर अनेक कुमारी मुलींना या मार्गावर जाण्याचा दरवाजा राजरोसपणे खुला झाला. त्यासाठी मोहिनीदेवीला मोठा त्याग करावा लागला. तिचा त्याग जैन
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org