________________
गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ
एकदा उत्तररात्री मैनाने एक स्वप्न पाहिले.
मैना श्वेतवस्त्रे परिधान करून हातामध्ये पूजासामग्री घेवून मंदिरात निघाली आहे. आकाशात बरोबर तिच्या मस्तकावर पौर्णिमिच्या पूर्ण चंद्र तेजस्वीपरन्तु शीतल किरणांचा वर्षाव करीत तिच्या संगतीने चालत आहे. फक्त मैनेवर आणि आजुबाजूच्या परिसरातच चांदण्याचा प्रकाश पडला होता. बाकी कुठेही त्याचा मागमूस नव्हता. शेजारपाजारचे लोक आश्चर्यचकित होऊन हे दृष्य पहात होते.
या सुखद स्वप्रातून मैना जागी झाली. स्वप्रातही भगवंताचे दर्शन झाल्यामुळे मनोमन खूप आनंदली होती. तिचे स्वप्न साधे नव्हते. तिच्या उम्बल भविष्याचे प्रतिक होते. त्याची मैनेला पूर्ण कल्पना आली.
मैनाने देवपूजनादि क्रिया आटपून आपले धाकटे बंधु कैलाशचंद्र याना आपले स्वप्न सांगितले. त्याना आपल्या जीजीचा कल कुणीकड़े आहे हे चांगले माहित होते. ते ताबडतोब म्हणाले, जीजी तुझ्या स्वप्रावरून असे वाटते की लवकरच तुझी मनोकामना पुरी होणार.
[३५३
मैनाच्या आचार विचारावरून तर सर्व परिवाराला भय वाटायचे की ही घराच्या अंगणातून उडून तर जाणार नाही:
भोजन वगैरे आटपून मैनाचे पिताजी माडीवर आराम करीत बसले होते. संधी पाहून मैना तेथे आली. लाडांत येऊन इकडच्या तिकडच्या थोडया गप्पा मारल्या आणि नंतर हळूच आपले स्वप्र सांगितले. स्वप्न ऐकून पिताजी मनांत उमजले. परंतु वरकरणी खळखळून हसत म्हणाले, मैना बेटा । घरातून उडून जायचा तुझा विचार दिसतोय. पण लक्षांत घे. तुझ्यावाचून या घरात राहणे आम्हाला आवडेल काय?
योगायोगाने त्याचवेळी सन् १९५९ मध्ये आचार्यरत्न देशभूषण महाराज विहार करीत करीत ससंघ टिकैतनगरांत आले. मैनाला आपल्या जीवनांत प्रथमच दिगंबर मुनींचे दर्शन घडले. मुनींच्या दर्शनाने तिला कृतार्थ झाल्याचे अतीव समाधान लाभले.
मैनाने आपल्या मातेजवळ ब्रह्मचर्य व्रत घेण्याची इच्छा अनकवेळा प्रकट केली. परंतु मोहिनी देवी ने प्रत्येकवेळी तिला उडवून लावले होते. तिच्या दृष्टीने ही गोष्ट अगदी असंभव होती.
एकदा घरातील कामकाज आटपून मैना मोहिनीदेवी बरोबर आचार्यश्रींच्या दर्शनार्थ मंदिरात गेली. संधी पाहून आचार्यश्रींना तिने विचारले, महाराजजी मला आत्मकल्याण करण्याचा अधिकार आहे किंवा नाही? महाराजजी प्रसन्नतेने म्हणाले, जैन धर्मात तर पशुपक्षांनाही आत्मकल्याणाचा अधिकार आहे. तूं तर मनुष्य आहेस. महाराजांचे अमृतमय वचन एकून मैना अंतर्यामी आनंदाने फुलून गेली. जणु कांही तिची मनोकामना सफल होण्याचा समय निकट आला आहे.
Jain Educationa International
तेंव्ढयांत मोहिनीदेवी म्हणताल्या, "महाराजजी हिचा हात तरी पहा हिच्या भाग्यांत विवाह आहे किंवा नाही? आचार्यश्रींना ज्योतिषविद्येचे ज्ञान होते. त्यांनी मैनाचा हात पाहिला ते म्हणाले हिच्या हातात राजयोग आहे. ही लवकरच घराचा त्याग करणार आहे. हिचे मरण संन्यासावस्थेत आहे. घरा मध्ये नाहीं. खरे तर "ज्योतिष" या नांवाची देखिल मोहिनीदेवीला अत्यंत चीड होती. तरी देखिल दिगंबर मुनींचे वचन मिथ्या होणार नाही यावर तिचा पूर्ण विश्वास होता.
महाराजजींनी मैनेची परीक्षा घेण्यासाठी दोन चार प्रश्न विचारले. मैनेने देखिल "पद्मनंदिपंचविंशतिका" ग्रंथातील श्लोकाचे दाखले देवून, वैराम्याला अनुसरून त्याची उचित उत्तरे दिली. तेव्हा महाराज म्हणाले, ठिक आहे. तुझे मन खरोखरच विरक्त झालेले आहे. आता पुरुषार्थ करण्यास उद्युक्त हो." मैना मनातून खुश झाली. यानंतर महाराजजींना आहार देण्यात, प्रवचन ऐकण्यांत तिचे दिवस व्यतीत होऊ लागले.
एक दिवस मंदिरासमोरील मोठया मण्डपात आचार्यश्रींचा केशलोच चालला होता. शरीरावरील निर्मलतादर्शक केशलोच पहाण्यासाठी जैन आणि जैनेतर लोकांची खूप गर्दी मंडपात जमली होती. त्या गर्दीत मैनाही बसली होती. महाराजांचा केशलोच भक्तीपूर्वक पहात होतो. बघता बघना तिच्या मनांत वैराग्य भावना अधिकच उत्कटतेने उसळून आली. ती मनातल्या मनात विचार करू लागली- "हे भगवन । हे त्रिलोकनाथ । माझ्या जीवनांत असा शुभसमय केव्हा येईल ? हा विचार मनात येताच तिचा डावा डोळा व डावी भुजा फडफडु लागलो. हे शुभसुचक होते. त्याचा अर्थ मैनाने जाणला. ती आनंदून गेली.
कांही दिवसांतच आचार्यश्रींचा टिकैतनगरीहून विहार झाला. त्यांच्या बरोबर जाण्याची मैनाची खूप इच्छा होती. परंतु सामाजिक व कौटुंबिक संर्घषामुळे ती जावू शकली नाही. जाता जाता आचार्यश्रींनी आशिर्वाद दिला. भिऊ नकोस. ते लोक आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत. तु आपल्या कर्तव्याचे पालन कर. लवकरच सफलता प्राप्त होईल. आचार्यश्री गेले. जणू सारा प्रकाशच गेला. चैतन्य गेले. मैना अत्यन्त उदास झाली. तिला उदास पाहून तिचे माता पिताही उदास झाले. त्यांच्यावर मोठे कठिण प्रसंग आला होता. मैनाला महाराजांच्या बरोबर पाठवावे तरी दुःखच न पाठवावे तरी तिच्या दुःखी होण्याने दुःखच.
परंतु घडणारे कोणी टाळू शकत नाही. ते सामर्थ्य कोणाच्याही हाती नाही. मैनाची वैराग्यभावना अत्यंत तीव्र होती. मैनाला सात कुलूप लावलेल्या कोठडीत जरी बंद करून ठेवले असते तरी तिच्या उत्कट वैराग्याने बंधन स्वरूप असलेले कुलूप स्वयमेव तुटून गेले असते. आणि तिचा मार्ग मोकळा झाला असता.
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org