SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 414
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३५२] वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला मैना आता १४ वर्षाची किशोरी झाली. घरामध्ये आगम शास्त्रांचा, अध्यात्मशास्त्रांचा मोठा संग्रह होता. दादा, परदादा पासून कोणीतरी त्याचा संग्रह करून ठेवला होता. अलीकडच्या पिढीतील कोणीही त्याला हात लावण्याचे धाडस करीत नव्हते. आपल्या आवाक्याच्या बाहेरचे ते काम आहे अशी सर्वाची समजूत होती. पण मैना याला अपवाद निघाली. मैनेने सगळी शास्त्रे अभ्यासून काढली. त्यांचे वारंवार मनन चिंतन केले. सारी शास्त्रे जणु योग्य अभ्यासकाची वाटच पहात होते. त्यांच्या सुदैवान मैनेसारखे विलक्षण प्रतिभावंत पात्र त्यांना अवचित मिळाले. त्यांनी आपले सारे ज्ञानामृत मैनेच्या ओंजळीत रिते केले. याचे फळ म्हणजे मैनेला एवढया लहान वयातही उच्च विचारांचे चितन करण्याची क्षमता प्राप्त झाली. बुद्धी प्रगल्भ झाली. मैनेच्या मातेला तिच्या पित्याकडून भेट म्हणून मिळालेल्या “पद्मनंदिपंचविंशतिका" तसेच छहढाला या ग्रंथाच्या स्वाध महत्व व मिथ्वात्वाची अयथार्थता पूर्णपणे समजली. समयकत्वावर गाढ़ श्रद्धा बसली. एकदा काय झाले, मैनेच्या शेजारी राहणा-या १६ वर्षाच्या तरूण मुलाला देवी आल्या होत्या. त्याची आई अतिशय अंधश्रद्धाळू होती. कोणी काय सांगितले ते उपाय करीत होती. कोणी म्हटलं लिंबाच्या झाडाची पूजा कर, कोणी सांगत पूजेसाठी माळिणीला पूजासामग्री दे. त्याप्रमाणे ती करू लागली. योगा योगाने त्याचवेळी मैनाच्या धाकटया भावाना प्रकाश आणि सुभाष यांना देखील मोठया प्रमाणात देवी निघाल्या. घरातले सगळे घाबरले. मोठी मंडळी शीतला मातेच्या पुजेसाठी माळिणीला पूजा सामग्री देवू लागली. पण मैनाने आणि मोहिनी देवी ने त्याना मना केली. दोघी नीही मिथ्यात्वाचा त्याग केला होता. असल्या भंकूस गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. दोघीही जिनेंद्र भगवानाच्या भक्तीमध्ये दृढ राहिल्या. वृद्ध सासू मोहिनीदेवीची समजूत घालू लागली. ___"बहू ! तुला पटत नसेल तर तू स्वतः पूजा करू नकोस. पण माळीणीला पूजा सामग्री देण्याला काय हरकत आहे. तुझी मुले वेदनेने तळमळत आहे, याच तुला काही नाही। स्वतःचाच हट्ट पुरा करतेस? भगवंता। या घरात काय काय अनिष्ट घड़णार आहे ते तुलाच महित." म्हातारी रोज त्रागा करीत होती. झाडावडाची मिथ्या देवीची पूजा करण्या साठी गळ घालीत होती. पण मैना व मोहिनीदेवी म्हातारीला अजिबात बधल्या नाहीत. भावंडांची गंभीर स्थिती पाहून मैना आईला धीर देत होती. जिनेंद्र भगवंताच्या ठायी दृढश्रद्धा ठेवण्यास प्रेरणा देत होती. स्वतः रोज मंदिरात जावून शीतलनाथ भगवंताची पूजा करायची, गंधोदक आणून भावंडांच्या सर्वागाला भक्तीपूर्वक लावायची. परंतु असाता कर्माच्या उदयामुळे भावंडाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली. त्यान्ची अवस्था चिंताजनक झाली. जगण्याचीही आशा उरली नाही. आजूबाजूचे लोक कुजबुजु लागले. "ही मैना आपल्या भावंडाना मारून टाकणार. वारे। तिचा धर्म । घरांत भावंड मरू लागलीत आणि ही नुसता धर्म धर्म करीत बसलो." असले कठोर वाकताउन ऐकून मैना मनात घाबरुन जायची. परंतु बाहेर तसे न दाखविता दृढतेने सर्वाना धीर द्यायची. आपल्या तत्वावर तिचा अटल विश्वास होता. एक दिवस भल्या सकाळी मैना मंदिरात गेली. भगवंता समीर हात जोडून कळवळून प्रार्थना करू लागली. "हे भगवन । आता माझी आणि धर्माची लाज तुझ्याच हाती आहे. जर कान या दोन बालकांचे चरे बरे वाईट झाले तर सर्वाची धर्मावरची श्रद्धा उडेल. सम्यक्त्वाला सोडून मिथ्यामार्गाचा अवलंब करती,. तुझ्या भक्तीचे महत्त्व कुणाला समजणार नाही. सर्वाची घोर फसवणूक होईल. असे अधः पतन होवू देवू नकोस ..... होऊ देवू नकोस." सादय दिलाने घातलेली साद भगवंतापर्यंत पोहोचते. मैनाच्या दृढ निश्चयाचे फल मिळाले. काही दिवसातच दीन्ही बालकांची स्थिती सुधारू लागली. आणि पहाता पहाता ते पूर्ण बरे झाले. त्या दरम्यान शेजा-याचा मुलगा . . . ज्याची आई तो बरा व्हावा म्हणून मिथ्यात्वाची उपासना करीत होती ... तो मात्र स्वर्गवासी झाला. या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेन सर्वाच्या मनावर धर्माच्या, सम्यकत्वाच्या अतिशय प्रभाव पडला. सर्व गावातमैनाची, तिच्या दृढनिश्चयाची प्रशंसा होऊ लागली कितीतरी लोकानी मिथ्यात्वाचा त्याग केले आणि सम्यकत्व ग्रहण केले. मैनाची किर्ती चोहीकडे पसरली. एकदा बुंदेलेखंडेचे एक पंडीत मनोहरलालजी शास्त्री टिकैतनगरांत आले. त्यांनी मैनेच्या मुखी सम्यकत्वमिथ्यात्वाची परिभाषा ऐकली आणि ते अवाक् झाले. पंडीतजी मैनाच्या कुटुंबीजनाना उद्देशून म्हणाले “आपल्या घरी जन्मलेली ही कन्या साक्षात देवी आहे. अत्यन्त विद्वान आहे." मैनाची जन्मदात्री माता पू० आर्यिका रत्नमती माताजी मैनाबद्दलचे आपले भाव व्यक्त करताना म्हणतात. "त्यावेळी मलाच काय परंतु आमच्या परिवारालाही मैनेसारखे कन्यारत्न लाभले याचा अभिमान वाटायचा, गौरव वाटायचा. त्या लहान वयातही मैनेच विचार अत्यंत उच्च होते. तो नेहेती म्हणायची . . . . . . . ." "हे भगवन ! सा-या प्रांतातच नव्हे तर सर्व देशांत जैनधर्माचा विश्वधर्माच्या स्वरूपांत प्रचार करेन अशी मला शक्ती प्राप्त होवो. कारणसर्व प्राणिमात्रा ख-या शांती सुखाचे मधु फल देण्याचे सामर्थ्य याच एका धर्मात आहे." प्रकरण ३ जैनधर्माला विश्वधर्माच्या स्वरूपतां प्रसार करण्याची उत्कट भावना मैनाच्या मनी मानसी दृढ झाली होती. त्याला साकार रूप देण्याचे श्रेय राष्ट्रसंत आचार्यश्री देशभूषण महाराजाना आहे. Jain Educationa international For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.012075
Book TitleAryikaratna Gyanmati Abhivandan Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorRavindra Jain
PublisherDigambar Jain Trilok Shodh Sansthan
Publication Year1992
Total Pages822
LanguageHindi
ClassificationSmruti_Granth
File Size26 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy