SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 413
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ [३५१ पंडितजींनी सांगितलेली ही गोष्ट माझ्या मनामध्ये चांगलीच कोरली गेली. नियतिच्या गर्भात काय लपलेले असते हे कुणालाच माहित नसते. नाहीतर प्राथमिक स्वरूपाचा हा स्वाध्याय मैनाच्या मनावर खोलवर ठसला जावून तिला आपल्या कुटुंबियांपासून विभक्त करण्यास कारणीभूत ठरेल याची थोडी जरी जाणीव घरच्यांना झाली असती तर मैनेवर असे संस्कार करण्याच्या भरीला ते पडले असते की नाही देवजाणे. परन्तु होणारे टळत नसते. __ ज्यांचे कल्याण होणे हे निश्चित असते अशा जीवांना त्यायोग्य निमित्त सहजतेने प्राप्त होते. मैनेलाही तहे अवसर स्वयमेव मिळत गेले. मातेच्या प्रेरणेमुळे दर्शनकथा, शीलकथा यांच्या वाचनाने तिच्या मनावर एवढा गाढ परिणाम झाला की एक दिवस अंतःस्फूर्तीने ती मंदिरात गेली. भगवंताच्या पुढे हात जोडून अंतरीक तळमयळीने ती म्हणाली हे भगवन् । मनोरमेला भेटले तसे कोणी दिगंबर साधू अजून तरी माझ्या दृष्टीपथांत आलेले नाहीत. म्हणून मी आपल्या चरणाशीचं शीलव्रताची प्रतिज्ञा घेत आहे. मी आजन्मपर्यंत शीलव्रताचे पूर्णतया पालन करीन. तसेच दर्शनकथा ऐकून नियमितपणे देवदर्शन करण्याचा निमत घेतला. याप्रमाणे घराच्या उंबरठयाआड, चार भिन्तीत राहून मैना आपण ठरविलेला जीवनमार्ग अनुसरु लागली. तिचा दृढ निश्चय पाहून नियतिही तिला आज्ञाधारक पणे साथ देऊ लागली. एकदा जैन पाठशाळेतील मुलांनी "अकलंक निष्कलंक" या नाटकाचा प्रयोग केला. त्यात एके ठिकाणी अकलंक व त्यांच्या पित्याच्या संवादांत एक ओळ या प्रमाणे होती- “प्रक्षालनाद्धि पंकस्य दूरादस्पर्शनं वरं । “चिखलात पाय भरवून नंतर ते धुण्यापेक्षा चिखलांत पाय न ठेवलेलेच चांगले नाही का? त्याप्रमाणे विवाह करून नंतर सोडून दीक्षा घेण्यापेक्षा विवाह न केलेलाच उत्तम नाही का? या ओळी मैनेच्या मस्तकांत घट्ट पाय रोवून बसल्या. तिने ताबडतोब मनाशी संकल्प केला. हे भगवन् मी विवाह बंधनांत फसणार नाही. या घराच्या पिंज-यातून कसेही करून बाहेर पडणार आणि खुल्या आकाशांत विहार करणार. मैना माठी होऊ लागली. लडखडत् पावले टाकीत चालू लागली. बोबडया भाषेत बोलू लागली. मैनाचे पिताजी छोटेलाल मैनाच्या ओढी ने आता लवकर दुकान बंद करून घरी येत. मैना बरोबर तासन तास खेळत बसत. कधी कधी मैनेला आपल्या बरोबर दुकानीही घेऊन जात. बघता बघतां दिवस, महिने, वर्ष लोटले. मैना ५/६ वर्षाची झाली. आता शाळेत जाण्याची वेळ आली. छोटेलालजी ने कौतुकानी तिला नवीन पाटी तु पेंन्सील आपाली. नवीन कपडे शिवले. अशा नव्या जमानिम्यांत तिला नेऊन जैन पाठशालेत नांव नोंदविले. शाळेत जाण्याच्या दिवशी प्रथम तिने देवाला नमस्कार केला. नंतर घरांतील सर्वानानमस्कार करून उजवा पाय घराबाहेर टाकला. ज्ञानाच्या दालनांता फिरण्याची पावलाना घाई झाली होती. विश्ववाचे रहस्य जाणून घेण्याची आतुरता तिच्या निरागस, चमकदार डोळयांत होती. पं० कामताप्रसाद शास्त्री आणि पं० जमुनाप्रसाद शास्त्री कटनीवाले हे जैन पाठशालेचे अध्यापक होते. छोटेलालजी नी मैनाला पंडितद्वायांच्या स्वाधीन केले. थोडयाच दिवसांतम तिने आपल्या प्रखर बुद्धीने, गोड स्वभावाने, लाघवी बोलण्याने त्यांचे मन जिंकून घेतले. त्याना मैनासंबंधी बोलताना म्हणतात. "ही कन्यातर विलक्षण प्रतिभावंत. हीची प्रखरबुद्धी म्हणजे पूर्वजन्माची देन आहे. मैना म्हणजे साक्षात सरस्वतीची प्रतिमूर्ती." मैनाच्या घरांत जिनागमाला बाधा येणा-या कांही पूर्वापार परंपरेने चालत आवेल्या रूढींचे निष्ठेने पालन केले जाई. घरांत जैनतत्वाचा विशेष अभ्यास नसल्यामुळे या रूढी चुकीच्या आहेत याची कुणाला कल्पनाच नव्हती. मैना त्यावेळी केवळ आठ वर्षाची होती. तिच्या बालबुद्धीला या गोष्टी पटेनात. जैनागमात सांगितलेल्या तत्वाच्या बरोबर विरुद्ध क्रियाकांडे घरांत चालल्या होत्या. मैनेने या क्रियाकांडाना निक्षून विरोध केला आणि ही सर्व क्रियाकांडे बंद करण्यास घरातल्याना भाग पाडले. म्हातारी दादी आजी घाबरून म्हणू लागली. 'बेटा मैना ! तू हे काय करतेस? आमच्या पूर्वजांपासून चालत आलेल्या परंपरा खोटया कशा असतील? त्यातूं बंद करू नकोस. कांहीतरी अनिष्ट घडेल." मैना आपल्या आजीला प्रेमाने समजावीत म्हणाली दादी आजी ! ज्या परंपरा तू पाळतेस त्या मिथ्यामान्यतेवर आधारलेल्या आहेत. या मिथ्यात्वा मुळेच आपण अनन्त दुःखाला कारणीभूत असणा-या संसरात चारही गतीतून फिरत आहोत. दुर्लभ असा चिंतामणी समान मनुष्यजन्म मिळाला आहे, तो असा मिथ्यात्वामध्ये वाया घालवायचा का? सम्यक्दृष्टी होऊन मानवजन्माचे सार्थक नको का करायला? इवल्याशा तोंडी येवढी मोठी गोष्ट विसंगत वाटत होती. पण तो सत्य होती. मैनाची बुद्धी वयाची मर्यादा ओलांडू पहात होती. मैनाने शास्त्रीय आधारावर आपले म्हणने सर्वाना पटवून दिले. मोहिनीदेवी ने तावडतोब मिथ्यात्वाचा त्याग केला, आणि घरातील अनिष्ट परंपरा बंद केल्या. मैनाची बुद्धी प्रौढत्वाला साजेल अशी संयमी समंजस असुनही कधी कधी बालसुलभ वृत्तीमुळे आपल्या मैत्रिणीबरोबर बाहेर खेळायला जावे असे तिला बाटे. त्यावेळी मोहिनीदेवी तिला प्रेमाने म्हणे "बेटा ! या फालतु खेळयत वेळ कशाला वाया घालवितेस? त्यापेक्षा या पुस्तकातील शीलकथा वाचू या, दर्शनकथा वाचू या. पहा । यात खेळण्यापेक्षा केवढहा आनंद भरला आहे." __मैना स्वतःच धर्म स्वरूपाने जणु धमनिच धरतीवर अवतार घेतला होता, त्यात मातेच्या सुंदर संस्काराने त्या धर्मस्वरूपातून सरस्वतीची सुंदर मूर्ती निर्माण केली. Jain Educationa international For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.012075
Book TitleAryikaratna Gyanmati Abhivandan Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorRavindra Jain
PublisherDigambar Jain Trilok Shodh Sansthan
Publication Year1992
Total Pages822
LanguageHindi
ClassificationSmruti_Granth
File Size26 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy