________________
३५०]
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
__ मोहिनीदेवी रोज नियमितपणे या ग्रंथाचा स्वाध्याय करीत असे. जिनेंद्रदेवाची आराधना, स्वाध्याय याचे फल म्हणजे या सुंदर कन्यारत्नाची प्राप्ती होय, अशी तिची गाढ श्रद्धा होती. अपत्यजस्मापूर्वी ती स्वाध्याय करीत होतीच पण आता देखिल आपल्या कन्येला मांडोवर घेऊन जिनपूजन, वंदना, स्वाध्याय आदि धार्मिक क्रिया करीत असे. यामुळे आपल्या मुलीवर उत्तम संस्कार होतील असा तिचा विश्वास होता.
___ सर्वाच्या लाडाकोडांत कौतुकांत नहात छोटूली दिवसेंदिवस कांतीमान होत चालली, आपल्या बाललीलानी घरादाराला, शेजा-या पाजा-यानी मोहवित होती खुळे करीत होती. क्षणभरहो तिचे दर्शन झाले नाहीतर सारे कासाविस होत. तिचा क्षणाचाही विरह सा-याना असहय होत असे.
मोहिनीदेवीच्या माहेरी कन्यारत्नाच्या आगमनाचा शुभसमाचार गेला होताच. रिती रिवाजाप्रमाणे मोहिनीदेवीच्या पिताजीनी आपल्या चिरंजीवाला, मोहिनी देवीला आणायला पाठविले. छोटी आजोळी जाणार म्हणून घरातील सर्वाना वाईट वाटले. तिचा काही दिवसांचा विरह सहन करने सर्वाच्या जीवावर आले. तिच्या वाचून घर म्हणजे प्रकाशा वाचून अंधार रूढी परंपरेनुसार मोहिनीदेवीला माहेरी पाठविणे भागच होते. "छोटी" पण तिच्याबरोबर आजोळी गेली.
छोटीने आजोळी देखिल आपल्या बाल सुलभ क्रीडानी सर्वाना वेडावून टाकले. कोणीही तिला खाली ठेवत नव्हते. तिच्याकडे कौतुकाने पहात आजीबा सुखपालदास म्हणाले मोहिनी। या छोटी ने इथं सर्वाना मोहवून टाकलय. मी तिच नांव "मैना" ठेवतो. मैनेप्रमाणे सर्व घरादाराला रिझवत असते.
आजी मत्तोदेवीपदराने तोंड झाकीत हसत म्हणाली मैना नांव शोभतय खरं. केंव्हानाकेंव्हा ही घरच्या अंगणातून उडून जाणार ।
सर्वजण खो खो हसले. या प्रकारे हास्यविनोदात, हसी खुषीच्या वातावरणांत, आजोबा, आजी, मामा, यांच्याकडे खांद्यावर मैना माठी होवू लागली. पहाता पहाता पाळण्यातून खाली उतरून रांगू लागली. रांगायला तिला घर अंगण अपुरे पडू लागले. ___काही महिने उलटले. मोहिनीदेवी छोटया मैनेला घेवून पुनः सासरी आली. सर्वानी अत्यनंदाने मैनेचे स्वागत केले. जणु काही अमावस्या जावून पौर्णिमा आली. घर प्रकाशाने न्हाऊन निघाले.
आजोबानी ठेवलेले "मैना" हेच नांव रूढ झाले. प्रत्येकाच्या तोंडी "मैना" खेरीज दुसरा शब्द नव्हता. तिच्याशी खेळताना सारेजण आपली चिंता, व्याप, थकवा विसरून जात.
___घरचा सगळा कारभार मोहिनीदेवी संभाळत होती. आला गेला पै पाहुणा आहे नाही, दुखणी खुपणी स्वयंपाकपाणी सगळ काही ती प्रसन्न चिताने करीत होती. पण या सगळया व्यापांत छोटया मैनेची एवढी देखिल आबाळ होऊ देत नव्हती. तिला दूध पाजविताना, पाळण्यांत झोके देताना, झोपविताना भक्तामरस्तोत्र, बाराभावना, शीलकया इत्यादि स्तोत्रांची अंगाई गात असे. म्हणतातच की माता ही मुलांची प्रथम "गुरु" असते. शंभर शिक्षक शिकवू शकणार नाही ते काम एकटी आई करते. मोहिनीदेवी ने आपले मातृत्व सार्थ केले. अप्रतिम संस्काराचे बाळकडू आपल्या वात्सल्यपूर्ण हातानी मैनेला पाजविले.
प्रकरण २ मैत्रिणीसोबत खेळायला, फिरायला न मिळाय्यामुळे मैना कधी कधी खूप निराश व्हायची. वाटायचं, “आम्हा मुलींचं जीवन किती पराधीन आहे. धरातील जसे सांगतील तसेच वागायचे. आमच्या भावनांचा आवडणीचा काहीच विचार नाही.
परंतु हे विचार तेवढयापुरतेच रहात. मातेच्या प्रेमाच्या वर्षावाखाली सारे उदास विचार धुवून जात. नैराश्य नाहिसे होई. मातेचे मैनावर एवढे प्रेम होते की तिला क्षणभरही आपल्या नजरेआड होऊ देत नसे. मोहिनीदेवी मैनेला म्हणायची “बेटा ! चल आपण दोघी मिळून लवकर लवकर काम आटपून घेऊ आणि मंदिरात आऊ, आरती करूं, स्वाध्याय करूं. ___मंदिरात जायचे म्हटल्यावर मैनेला खूप आनंद व्हायचा. उत्साहाने, आईच्या हाताखाली झटपट कामे उरकायची मग आईबरोबर मंदिरात जावून भक्तीपूर्वक भगवंताची आरती करायची स्तवने गायची नन्तर लक्षपूर्वक शास्त्र ऐकायची.
मंदिरात तिच्या मैत्रिणीही यायच्या. पण त्यांच्याबरोबर कधी ती चेष्टा मस्करी, गप्पा मारणे यात वेळ घालवीत नसे. मोठया बायकांत बसून एकाग्रतेने प्रवचन ऐकत, त्यावर मनन, चिंतन करत असे. मातेच्या संस्काराचाच हा प्रभाव होता.
पू० ज्ञानमती माताजी आपल्या बाल्यावस्थेतील आठवणी सांगताना एक किस्सा नेहमी सांगतात- एकदा मंदिरात रात्रीच्या वेळी प्रवचन सांगतानाएका प्रकरणांत उल्लेख आला. प्रत्येक प्राण्याचा आत्मा अनंत शक्तीशाली आहे. हे ऐकताच माझ्या मनात विचार आला "जर आत्मा अनंत
तर माझ्या आत्म्याची शक्ती मला कशी प्रकट करता येईल? तेवढयांत पंडितजीच ओघात पुढे म्हणाले- आपली आत्मशक्ती आपण प्रकट करु शकतो. दुधामध्ये लपलेल्या तुपाला प्रगटरूप देण्यासाठी प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे आत्मशक्तीला जागृत करण्या साठी प्रायास करावा लागतो".
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org