________________
विचारवंतों के दृष्टि में
आचार्यश्रींचे वीरमरण
प्रा. द. रा. बेन्द्रे
चारित्र्याने प्रत्यंतर
आपल्या भरतखंडात अनेक मते नांदत आहेत. सर्वत्र व्याप्त अशी एकच एक वस्तू आहे असे म्हणणारे आहेत. बाह्यात्कारी व्यापलेले आणि प्रत्यक्ष दिसणारे त्याचेच तेवढे अस्तित्व मानणारे आहेत. आत - आणि बाहेर काही तरी व्यापलेले आहे हाच मुळी भास आहे, असेही एक मत आहे. चवथे एक मत आहे, बाह्य आणि आंतरिक यांची जी सरमिसळ अनुभवास येते त्याचा विवेक करून बाह्यापासून आंतरिकाची सोडवणूक करणे, आणि अशा या अंतरात्म्याच्या आत्यंतिक स्वरूपाचा अनुभव घेणे हेच जीवनाचे परम ध्येय आहे. जैन मताची रीत या चौथ्या प्रकारची आहे. पहिल्या तीन मतांत मरणाचा प्रश्न तितका मौलिक होत नाही. देहवाद्याला मरण वेगळे नाहीच. सर्वांतून आलेले आणि सर्वांत मिसळणारे यांना मरणात मोठे संवेदनीय असे काही नाहीच. जैन मतात देहाहून निराळा जीव नावाचा कोणी प्रत्येक आत्मा मानला • आहे. तो आत्मा ओळखावा लागतो, साधावा लागतो, आणि सिद्ध करता करता देहधारी जीव हा मरणशील नाही याचे प्रत्यंतर चारित्र्याने द्यावे लागते.
५३
शरणाचे गुण मरणात दिसतात
मरण कबूल करणारे आणि न करणारे अथवा त्याला भिणारे आणि न भिणारे या सर्वांना देहत्याग -करावाच लागतो. मरणाचा शिक्कामोर्तब करून घ्यावा लागतो. तेव्हा मरणकाल या अटळ गोष्टीविषयी वागत असताना आपले आचरण कसे राहते याला फार महत्त्व आहे. 'शरणाचे गुण मरणात दिसतात' अशी कन्नड भाषेत एक म्हण आहे. त्याचा अर्थ हा मोठेपणाचा दिमाख इतर कोणत्याही वेळी करता येईल पण तो मरणकाळी टिकणे फार कठिण आहे.
म्हणून मरणकाळी एखाद्याचे वर्तन किंवा मनाची स्थिती कशी असते त्यावरून त्याच्या मोठेपणाचा अजमास होऊ शकतो. आत्महत्या करून घेणारे हे मरणाला भीत नसतात असे नव्हे. जेव्हा विवेक खुंटतो आणि दुसरे काय करावे हे कळत नाही तेव्हा मरणाचा रस्ता सोपा आणि जवळचा वाटतो. रणांगणावर मरणारे सामान्य आणि असामान्य वीर तेथे आपली मरणाशी गाठ आहे हे जाणूनही न डगमगता लढाई छेडतात आणि अनेक वार सहन करूनही मरणान्त लढत असतात. त्यांच्या प्राणशक्तीची तारीफ ही केलीच पाहिजे. तो एक उत्साह भावनेचा, उत्कट वीर्याचा प्रकारच आहे. ' मरणकाळी हे देवा तुझं स्मरण राहो' अशा अर्थाच्या प्रार्थना कित्येक आहेत. जीवनव्यवहारात बराचसा 'देव देव' करणारा मरणकाळी
Jain Education International
भांबावून जातो आणि लौकिक गोष्टींनी चिंतामग्न होतो. कित्येकांना त्यावेळी स्मृतीही रहात नाही. - जागेपणा असेल तर स्वास्थ्य नसते. याचे कारण असे
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org