________________
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
विरोध तत्त्वनिष्ठ शास्त्रनिष्ठ; वैयक्तिक नव्हे
त्यावेळी वर्धा हे विधवाविवाहादि सुधारणावाद्यांचे केन्द्र होते. श्री ब्र. शीतलप्रसादजी यांचा मुक्काम चिरंजीलालजी बडजातेकडे होता. त्यांनी व जैन महामंडळ सदस्यांनी सैतवाळ समाजाला चेतावणी दिली. " 'जर शांतिसागर महाराज आपल्या हातून आहार घेत नाहीत तर आपण त्यांचा पूजा सत्कार कसा करावा. म्हणून त्यावेळी अशांतीचे वातावरण उत्पन्न झाले होते. सैतवाळ समाजधुरीणांनी आपण आमच्या हातचा आहार घेत नाही हे उचित आहे का ? " असा सवाल टाकला.
""
((
१७०
महाराजांनी सर्व प्रसंग समयोचित चातुर्याने व अपूर्व शांततेने निभावून नेला. महाराज म्हणाले, " कोणत्याच जैन समाज - घटकाविषयी आमचे मनात कसलाही किन्तु वा विकल्प नाही. आपण किंवा कोणीही शास्त्राधार दाखवावा की, साधू विधवाविवाह करणाऱ्याकडून आहार घेऊ शकतात, तर माझी काहीच आडकाठी नाही. आम्ही साधुदीक्षा घेतानांच शास्त्राज्ञेप्रमाणे वागण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.
वाळच काय अन्य कोणत्याही जैन समाजात किंवा घटकांत विधवा विवाह वगैरे असेल तर तेथेही आम्हास आहार वर्ज्यच आहे." सर्व सैतवाळ समाजाचे परिवर्तन होऊन त्यावेळी काहींनी प्रतिज्ञा घेतली व सैतवाळ समाज घटकाकडे आचार्यश्रींचा आहार झाला.
यावेळी सर्व घटना फार चातुर्याने हाताळून महाराजांनी सर्व विरोधी वातावरणावर विजय प्राप्त केला. ज्या घरात विधवाविवाहादी नाहीत किंवा ज्यांनी प्रतिज्ञा घेतली तेथे महाराजांचा आहार होत असे.
सामाजिक एकतेची तळमळ
यानंतर संवत १९८४-८५ मध्ये शिखरजी येथे प्रतिष्ठा झाली त्यावेळची ही घटना आहे. त्या प्रतिष्ठामहोत्सवप्रसंगी भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अधिवेशन श्री. सवाईसंगई मोतीलालजी गुलाबसावजी, नागपूर यांचे अध्यक्षतेखाली भरले होते. त्यावेळी पंडित पार्टी विरुद्ध बाबु पार्टी हा वाद उत्तर भारतात फार माजला होता. हा वाद एकदा निकालात काढला जावा ही सर्वांची मनीषा होती. परिषेदेचे अध्यक्ष तनसुखलालजी राजेन्द्रकुमारजी तसेच दक्षिणेतून श्री. कुदळे, मगदुम वगैरे आणि महासभेमध्ये श्री. रावजी सखाराम दोशी, दावडा, भागचंदजी सोनी वगैरे महानुभाव सर्वच महाराजांचे समोर जमले. प. पू. आचार्य - श्रींनी मोजक्या शब्दांत आपले मनोगत सर्वांसमक्ष प्रगट केले.
66
आपण सर्व जिनधर्म, जैन तत्त्वज्ञान व भ. महावीरांचे अनुयायित्व मानणारे आहोत. तेव्हा वाद-विरोध या एका भूमिकेपुढे गौणच आहेत. हे सर्व मनोमालिन्य आपण आगमाच्या भक्कम आधाराने दूर करणे हे समाजहिताच्या दृष्टीने जरूर आहे. " या भावनेने या एकतेच्या उपक्रमाला महाराजांनी मनोभावाने आशीर्वाद दिला.
कोण हा समाजजागृतीबाबत वात्सल्यभाव ! या आणि अशाच कठीण प्रसंगी प. पू. आचार्यश्रींनी जे विवेकपूर्ण मार्गदर्शन केले त्यामुळे समाजामध्ये धर्मभाव व वात्सल्यभाव टिकून राहिला. अशा त्या rate अध्यात्म संत आचार्यश्रींना सविनय श्रद्धांजली.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org