________________
स्मृति-मंजूषा कार्यकर्त्याची निवड करण्याचे चातुर्य
वालचंद देवचंद प. पू. आचार्यश्रींनी सदरहु जीर्णोद्धारक संस्थेची स्थापना केली. संस्थेचा कारभार चोख चालावा म्हणून प्रामाणिक व सेवाभावी कार्यकर्त्यांची निवड करण्याचे अपूर्व चातुर्य महाराजांना होते. २ वर्षांत ३ लाखांचा ध्रुवनिधि जमला. हा सर्व निधि श्री. तुळजाराम चतुरचंद शहा, रा. बारामती यांना कोषाध्यक्ष नेमून त्यांचे स्वाधीन केला. मी संस्थेचा मंत्री होतो तेव्हाचा हा प्रसंग.
श्री. तुळजाराम शेठ आर्थिक व्यवहारात अत्यंत चोख असत. खाजगी देवघेवीच्या व्यावहाराच्या प्रसंगामुळे काही मोठ्या महानुभावांनी वैयक्तिक हेव्याने त्यांच्या बाबत समाजामध्ये कुजबुज फैलावली. " यांच्याजवळ गोळा केलेला सामाजिक निधि असून ते वैयक्तिक धंद्यासाठी त्याचा वापर करतात" असा त्यांचेवर आरोप होता. वस्तुतः संस्थेची शिल्लक आपल्या वहिखात्यांत पाच पैशापेक्षा जास्त असू नये व सर्व रक्कम बँकेतच जमा असावी हा त्यांचा पक्का दंडक. एवढेच नव्हे तर दातारांना स्वीकृत दान पाठवून देण्याबाबत वारंवार स्मरणपत्रे देवून त्यांचा लकडा मागे असावयाचा. पण हा रोखठोक व्यवहारच विरोधकांना बोचला. ही कुजबुज प. पू. महाराजांचे व तसेच श्री. शेठ तुळजारामचे कानावर गेली. शेठजी महाराजांकडे सर्व वहीखाते, बँकबुक, रोख शिल्लक घेऊन गेले व उपस्थित समाजासमोर म्हणाले, “ महाराज, हे वहीखाते ! सर्व जमा रक्कम ताबडतोब बँकेत जमा झाली की नाही हे बघा ! हे बँक बुक ! माझेकडे केव्हाही पाच पैशांपेक्षा जास्त शिल्लक नव्हती. आजही नाही. हा पाच पैशांचा उबार ! आणि हा माझा राजीनामा !"
महाराज हे पाहून सद्गदित झाले ! महाराजांनी सर्व आक्षेपकांना समज देऊन त्यांचे समाधान केले व तुळजाराम शेठला म्हणाले, " अरे बाबा, तुझ्या हातून असे काही होणार नाही याचा मला विश्वास आहे. माझा आदेश आहे तू हा राजीनामा परत घे व हा सर्व व्यवहार सांभाळ .”
___ महाराजांची आज्ञा अवमानण्याचे धाडस त्यांना झाले नाही. कार्यकर्त्यांची पारख करण्याचे हे चातुर्य ! यानंतर आजतागायत हे काम त्यांचेकडे व त्यांचे सुपुत्र माणिकचंद भाईकडे आहे !
प्रथम दर्शन
श्री. शांतिकुमारजी ठवळी, देउळगाव राजा श्री आचार्य महाराज ससंघ व संघपति यांना सर्वप्रथम पाहण्याचा योग बालवयात २७-१-१९२८ ला आला. प. पू. आचार्यश्री व संघ यांचे स्वागताप्रीत्यर्थ नागपूरला श्री. सवाईसंगई मोतीलाल गुलाबसाव यांचे अध्यक्षतेखाली स्वागत समिती आयोजित केली होती. श्री. अंबादासजी गहाणकरी यांचे आधिपत्याखालील स्वयंसेवक चमूमध्ये मी सामील होतो. संघाचा स्वागताचा अभूतपूर्व सोहळा आठवतो. त्यांचे आगमनाप्रीत्यर्थ स्मृती म्हणून त्या भागाला तेव्हापासून शांतिनगर संबोधण्यात येते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org