________________
१४०
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ त्याच वेळी श्री सखारामभाई शेठजींनी मूलाचार सानुवाद प्रकाशित करण्याचे महाराजांच्या चरणांना वंदन करून कबूल केले.
चौथी आठवण आचार्य महाराजांचा निवास सोलापूर येथील शान्तिनगरात होता. सर्व जैन दाते श्रावकांचाही निवास होता. पण त्यावेळी शेतवाळ श्रावकांच्या येथे आचार्य महाराजांचा व अन्य मुनीवर्यांचा आहार होत नव्हता. मी महाराजांना आहार आमच्या जातीच्या दात्यांच्या येथे आता का होत नाही याचे कारण काय असा प्रश्न विचारला. त्यावेळी आचार्य महाराजांनी मला म्हटले तुझ्या जातीच्या लोकांनी कुंथलगिरी येथे तुझा अपमान केला व ते अयोग्य गोष्टीला विधवाविवाहाला, चांगले समजतात, यामुळे या जातीच्या दात्यांचे येथे आहार घेणे योग्य नाही असे आम्हाला वाटते. यावर मी म्हणालो की, आचार्य महाराज परगावच्या काही शेतवाळ लोकांनी माझा अपमान केला पण सोलापुरातील सर्व सूज्ञ शेतवाळ समाज आगम मान्य प्रवृत्तींनीच वागत आहे व निषिद्ध कार्यापासून तो परावृत्त आहे असे मी त्यांना सांगितले व येथील शेतवाळ पंच मंडळींनी आम्ही जिनदास यांचा अपमान केला नाही व करणार नाही असे आवर्जून सांगितले व त्यानंतर महाराज व त्यांच्या संघातील मुनी व आर्यिकादिकांचा आहार होऊ लागला.
पाचवी आठवण 'हिन्दू मंदिरात हरिजनांचा प्रवेश' हे विधेयक जेव्हा पुढे आले तेव्हा जैन मंदिरात देखील हरिजन प्रवेश मान्य केला गेला व जैन हे देखील हिन्दू आहेत आणि जैन मंदिरे हिन्दू मंदिरासारखी आहेत असे लोक समजू लागले. त्यावेळी आचार्य शान्तिसागर महाराजांनी हा कायदा जैन मंदिरांवर लादू नये म्हणून त्यांनी कठिण नियम धारण केला.
___त्यांनी अन्नत्याग केला व त्यामुळे देशातील सर्व श्रावक समाज सक्रिय झाला. फलटणचे आदरणीय सेठ वीरचंद कोदरजी यांचे सुपुत्र श्री. माणिकचंदजी, श्री. तलकचंदजी शहा व मी असे दोघे जण मुंबई यथील ऐ. प. सरस्वती भवनातील अनेकान्त जैन ग्रंथातून हरिजनांना जैन मंदिरात प्रवेशाचा निषेध करणारी प्रमाणे हुडकून काढली. व ती संगतवार एकत्र केली आणि त्याचा खुलासेवार अर्थ लिहिला व त्या अनेक प्रमाणांची हजारो पुस्तके छापून घेतली.
महाराजांच्या अन्नत्यागामुळे सरकारला जैन हे हिंदूंपासून वेगळे आहेत व असे मानणे भाग पडले व जैन मंदिरात हरिजनांचा प्रवेश निषिद्ध केला गेला. या प्रकरणी एक शिष्टमंडळ ता. २५।१।१९५० साली भारताचे मुख्य प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांना भेटले व त्या शिष्टमंडळाने त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. याची फलनिष्पत्ती अशी झाली की प्रधान मंत्र्यांचे सचिवांनी श्री ए. बी. पाई यांनी प्रधान मंत्र्याच्या आज्ञेने एक पत्र लिहून शिष्टमंडळास तुमचे म्हणणे आम्हास मान्य आहे असे कळविले व असे लिहिले की बौद्ध जसे हिन्दु नाहीत तसे जैनधर्मावलम्बी जन देखील हिन्दु नाहीत.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org