________________
१३६
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ ३. अनिर्बन्ध विहार व समाजसंघटन
महाराजांचे विहारक्षेत्र वाढल्याने शेठ रावजी सखाराम दोशी, सोलापूर, संघपती मुंबई, शेठ चन्दुलाल, बारामती इत्यादि सत्त्वशील व धार्मिक शिष्य त्यांना मिळाले; इतकेच नव्हे तर भारताच्या निरनिराळ्या प्रांतांत विहार करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली ही एक ऐतिहासिक घटना आहे. महाराजांच्या विहारामुळे जैन निर्ग्रन्थ मुनी कोठेही विहार करू शकतात ही गोष्ट सिद्ध झाली. उत्तरेकडील जैनांना शुद्ध निर्ग्रन्यतेची कल्पना आली. महाराजांच्या पुण्याईने दक्षिणोत्तर जैन समाजातील विविध घटक जवळजवळ आले आणि जैन समाज संघटित होण्यास महाराजांची तपोमूर्ती बव्हंशाने कारणीभूत झाली.
निर्ग्रन्थ दीक्षेची प्रतिष्ठा वाढली ठिकठिकाणी महाराजांनी धार्मिक कृत्यांना उत्तेजन दिले, श्रावक-श्राविकांना व्रते दिली, आणि समाजाचे जीवन शुद्ध व स्वच्छ करण्यास ते कारणीभूत झाले. आचार्यश्री शांतिसागर यांना जी ख्याती व प्रसिद्धी मिळाली त्यामुळे निर्ग्रन्थ दीक्षेची प्रतिष्ठा वाढली, इतकेच नव्हे तर आचार्य महाराज हे एक युगपुरुष होऊन गेले आणि त्यांची परंपरा कोणत्या ना कोणत्या रूपात आजही चालू आहे.
चारित्रचक्रवर्ती आचार्य शान्तिसागर महाराजांविषयी
काही आठवणी साधुजनांच्या स्मरणाने देखील पापाचा नाश होतो व पुण्याची प्राप्ति होते. ज्यांच्या ठिकाणी पूर्व पुण्याचा उदय झाला आहे त्यांना सत्पुरुषांचे दर्शन होते व ते भावी पुण्यप्राप्तीलाही कारण आहे. ( साधुदर्शनापासून कोणते फायदे होतात याविषयी श्री वीरनंदी आचार्य असे म्हणतात--
श्रेयस्तनोति परिवर्धयतेविवेकमुन्मूलयत्ययमुदीरयते विभूतिम् ॥
त्वदर्शनं सुचरिताखिलभद्रेहतुर्नात्मीयसो भवति गम्यमिदं शुभस्य ॥
सत्पुरुषांचे दर्शन कल्याणाची वाढ करते, मनात विवेक उत्पन्न करते, पापांचा नाश करून भक्ताला वैभवयुक्त करते. उत्तम चारित्रसम्पन्न हे मुनिराजा, आपले दर्शन सर्व प्रकारच्या हिताला कारण आहे. ज्याचे पुण्य फार थोडे आहे अशा व्यक्तीला आपले दर्शन होत नाही. ज्यांचे मन, वचन व शरीर स्वपर हितासाठीच असते अशांचे दर्शन पुण्यप्राप्तीला कारण होतेच व असे साधु-गुरु संसारतरण तारणाला कारण होतात. असो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org