________________
स्मृति-मंजूषा
१३५ असलेल्या माझ्या एका विद्वान् मित्राने हा ग्रंथ श्वेताम्बर आहे असे सांगितले. मला पुढे सांगण्यात आले की, महाराजांना माझे या ग्रंथावरील कार्य तितकसे रुचले नाही. मी माझ्या विद्वान् मित्रास पत्र पाठवून विचारले की, 'हा ग्रन्थ श्वेताम्बर आहे असे तुम्ही कोणत्या आधाराने सांगितले ? ' उत्तर जे मिळाले ते लपवालपवीचे होते. कारण माझ्या विद्वान् मित्राने मला सांगितले, 'हरिषेण म्हणजे मी 'हरिभद्र' समजलो. म्हणून तो ग्रन्थ श्वेताम्बर असे महाराजांना सांगितले.' पुढे जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी मी गेलो तेव्हा या गोष्टीचा मी खुलासा केला. मग महाराजांना बरे वाटले. त्याचवेळी मी या गोष्टीचाही महाराजांना खुलासा केला की माझ्या संशोधन-क्षेत्रात जैनच नव्हे तर जैनेतर ग्रंथांचाही समावेश होतो.
संशोधनातील प्रामाणिकतेबद्दल समाधान त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे महाराजांचे वास्तव्य सोलापुरी होते. दिवंगत 'पू. ब्रह्मचारी जीवराज भाई, प्रो. डॉ. हिरालालजी व मी महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. ओघानेच 'संजद' पदाविषयी चर्चा निघाली. डॉ. हिरालालजींनी आपली बाजू स्पष्ट केली. महाराजांना ती गोष्ट पटली नसली तरी आमच्या प्रामाणिक मतभेदाबद्दल महाराजांनी कौतुकच केले. आम्ही उपलब्ध पाठात कधीही बदल करीत नाही. पाठभेद मिळाले ते तेथे नमूद करतो हे ऐकून महाराजांना समाधान वाटले.
सदैव वाङ्मयसेवेसाठी आशीर्वाद पुढे एकदा माझे मित्र प्रिं. पत्रावळी (त्यांच्या सौभाग्यवतीही बरोबर होत्या) बरोबर मी महाराजांचे दर्शन शेडबाळ मुक्कामी घेतले. दर्शन घेतल्यानंतर प्रिं. पत्रावळींचा परिचय महाराजांना करून देताना सांगितले, 'प्रिं. पत्रावळी लवकरच रिटायर्ड म्हणजे सेवानिवृत्त होणार आहेत.' महाराजांनी पत्रावळींना उपदेश दिला व दीक्षा घेण्यास सांगितले. उपस्थित मंडळीपैकी माझ्या एका मित्राने 'संजद' शब्दाविषयी चर्चा उकरून काढण्याचा प्रयत्न केला; परंतु महाराजांचा कल मला माहीत असल्यामुळे मी तो विषय जाणूनबुजून टाळला. दर्शन घेऊन निघताना सदैव वाङ्मय-सेवा करीत राहण्यास आशीर्वाद मिळाला व त्यांचे ते दर्शन अखेरचे ठरले. ही गोष्ट १९५४-५५ सालातील आहे.
व्यक्तिमत्व व कार्य १. मिथ्यात्वाचे उच्चाटन
आचार्यश्री शांतिसागर महाराजांचे व्यक्तिमत्व व त्यांच्याकडून घडलेले कार्य यांचे येथे सिंहावलोकन करणे प्राप्त आहे. या भागात पूर्वी कुलदेवतांच्या पूजेचा फारच प्रचार होता आणि ते एका अर्थाने मिथ्यात्वच होते. याचे उच्चाटन करण्याचे प्रधान श्रेय आचार्यश्री शांतिसागर महाराजांनाच आहे. पाटील घराण्याशी त्यांचा जवळचा संबंध असल्याने हे कार्य त्यांच्याकडून फार सुलभतेने होऊ शकले. २. निर्ग्रन्थ दीक्षेचे पुनरुज्जीवन
___ महाराजांच्या आदर्श जीवनाने निर्वस्त्र निर्ग्रन्थ दीक्षेचे या भागात पुनरुज्जीवनच झाले. त्यांच्या विहारामुळे निर्ग्रन्थचर्या, भिक्षा देण्याची पद्धती, शुद्ध व अनुद्दिष्ट आहार या सर्व गोष्टींना शास्त्रोक्त बैठक मिळाली.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org