________________
१३२
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
"
सांगितले तरी त्यांचा आमचेवर काहीच परिणाम नाही. आपणासंबंधी माझ्या मनात कोणताही किन्तु नाही. प्रत्यक्ष भेटीचा बावीस वर्षाने योग आला तेव्हा श्री पायसागर महाराज म्हणाले, " होय गुरुदेव ! २२ वर्षे आपले दर्शन न झाल्याने आपणास एकदम ओळखू शकलो नाही म्हणून मी श्री नेमीसागर महाराजांचे समोर झालो. तेव्हा आचार्य श्री म्हणाले, "आता सामायिकाची वेळ झाली आहे. आपण मंदिराकडे जावे.
"3
99
सरळ व स्वच्छ अंतःकरणाचा तो परस्पर वार्तालाप व ते २२ वर्षानंतर भेटीचे मीलनाचे दृश्य पाहून उपस्थित श्रावकसमूहाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. तर दीर्घ कालानंतर गुरुदर्शनाने पायसागर महाराजांचे हृदयही शांत झाले.
अशा मृदु, समयसूचक संवादानंतर दुसरे दिवशी सर्व त्यागीगण गुंफेच्या आग्नेय भागाला बहिदिशेला जाऊन परतताना एकान्तामध्ये श्री पायसागर मुनी आ. श्री शांतिसागराचे पादवंदन करून विनंती - पूर्वक म्हणाले, " गुरुवर्य ! फार दिवसांपासून आपणाकडून प्रायश्चित्त मिळाले नाही तरी आज प्रायश्चित्त द्यावे. " आचार्य महाराज म्हणाले, “उठ रे बाबा ! तू काय अज्ञानी आहेस. कोणताही दोष तुझ्याकडून घडला तर तू स्वतः प्रायश्चित्त घेऊन शुद्धीकरण करीतच आलास. पुढेही असेच विशुद्ध जीवन धर्ममार्गाने घालवावे. " तेव्हा आचार्य महाराजाबरोबर ब्र. बाबुराव मार्ले कमंडलु घेऊन तर पायसागर महाराजांचे मागे १०५ क्ष. महाबल (आताचे स्मृति लेखक श्री १०८ श्री महाबल महाराज) होते. पायसागर मुनी हसत म्हणालेत, " तूही येथे उभा आहेस का ? " क्षुल्लक महाबल उद्गारले, “होय महाराज ! आपल्या गुरुशिष्य संवाद ऐकून व दृश्य पाहून कान व डोळे कृतार्थ झाले." अशा प्रकारे पायसागरांना जणू नवजीवन प्राप्त झाले असा होता आचार्य श्रींचा शिष्यावर अनुग्रह !
Jain Education International
आचार्य श्री : एक युगपुरुष डॉ. ए. एन्. उपाध्ये, एम्. ए., डी.लिट्. जैनॉलॉजी विभागप्रमुख, म्हैसूर विद्यापीठ
निर्ग्रन्थ मुनींची परंपरा
दक्षिणेत विशेषत: कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्र या भागात निर्ग्रन्थ मुनींची परंपरा अखंड चालू आहे अशी माझी समजूत आहे. विशेषेकरून मैसूरकडील निर्ग्रन्थ मुनी केव्हा केव्हा दक्षिण महाराष्ट्रात येत होते या गोष्टीची आठवण मला आहे. आता तो शब्द रूढ नाही, परंतु निर्ग्रन्थ मुनींना 'निर्वाण स्वामी' असे म्हणत असत. हा शब्द अजूनही अशिक्षित लोकांमध्ये रूढ आहे. साठ एक वर्षांच्या पूर्वी इकडे विहार करीत असलेल्या निर्वाण स्वामींत दोन वर्ग होते. जे सदैव काही भिक्षेच्या वेळी निर्वस्त्र राहून बाहेर येताना अंगावर एक वस्त्र ठेवीत असत. पाण्यासाठी एक कंमडलु, एक मयूर पिंछ व एक दान शास्त्र एवढाच निर्वाण स्वामींचा परिग्रह असे.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org