________________
स्मृति - मंजूषा
लोकविलक्षण मनोवृत्तीचे पूर्वरूप
एकदा ते शास्त्रस्वाध्यायासाठी मित्राकडे गेले होते. परतण्यास ११ ॥ वाजले. ते आपल्या वाड्यापाशी येतात, तो त्यांना एक चोर गुळढेप चोरताना आढळला. सहज नजरभेट झाली. मी समोर गेल्यास तो चोर भेली न नेता सोडून पळून जाईल, त्याने भेली तर न्यावी म्हणून लघुशंकेच्या निमित्ताने आडोशाला बसले, तर चोर, हा गृहस्थ आत गेला म्हणजे बाहेर जावे या इराद्याने, वाड्याच्या मोठ्या दरवाज्या मागे लपला ! बराच वेळ होऊनही तो चोर जात नाही म्हणून हे हळूच वाड्यात गेले व जाताना त्या चोरास ढेप नेण्यास खुणवून सोप्यात गेले. परंतु ही हकीकत त्यांनी तेव्हा घरातील कोणासही सांगितली नाही.
हजरजबाबीमध्ये बिरबलावर मात
महाराजांचा संघ विहार करत कोल्हापुरी असताना त्याचे प्रवचन ऐकण्यास संस्थानाधिपती सरकार आले होते. प्रवचनानंतर मंत्र्याने नम्रतेने व आशेने विचारले की, 'आमच्या सरकारांना पुत्रसंतान नाही. ते, केव्हा होईल ? ' तेव्हा अवधिज्ञान नसताना हे साधु काय सांगतात इकडेच सर्व पाहात होते. महाराज स्मितहास्यपूर्वक म्हणाले की, " सध्या आपल्या राजाच्या पोटी जन्म घेण्यासारखा पुण्यवान जीव कोणी नाही म्हणून राणीच्या पोटी येणार नाही " शास्त्रावरील अढळ विश्वासच जणू सहज बोलून गेला.
१३१
सहज नर्मविनोद
महाराजांची वृत्ति नेहमी प्रफुल्लित आनंदी असे. सहज विनोद त्यामुळे व्यवहारात दिसून येई. ते ध. ब्र. बाबुराव मार्ले यांना विनोदाने म्हणत, 'यापूर्वी आपण कोणास मारले म्हणून आपणास " मार्ले असे आडनाव पडले ? ' तेव्हा आजुबाजूंच्या श्रावक मंडळीत हशा पिकत असे.
गुरुशिष्याची अपूर्व भेट
१९५२ मध्ये आचार्य महाराज फलटण ( अनुग्रह तो अनुग्रह ) येथे असताना एके दिवशी सायंकाळी श्रावकांना सांगितले की, 'उदईक ' पायसागर मुनी आमचे दर्शनास येणार. त्यांच्या प्रवचनास लोक फार जमतात, जागा पुरणार नाही म्हणून श्री १००८ आदिनाथ मंदिराबाहेरील पटांगणात प्रवचनाची व्यवस्था करावी व संघस्थांची धर्मशाळेत सोय करावी. ' परंतु त्याच रात्री महाराजांच्या अचानक आतून आवाज आला व ते एकदम दहिगावकडे निघून गेले. महाराज श्री नेमीसागर समवेत बाहेरच्या गुंफेकडे निघून गेले. महाराजांच्या संकेताप्रमाणे गावातील श्रावक लोक पू. पायसागर महाराजांचे आगतस्वागतासाठी कुंभ डोक्यावर घेतलेल्या सुहासिनींसह सामोरे गेले. त्यांना गावामध्ये आणले. २२ वर्षांपासून गुरुचे दर्शन झाले नसल्यामुळे ते प्रथम महाराजांच्या निवास गुंफेकडे गेले. दोघेही बाहेरच बसले होते. गुरुदर्शनाचे आतुरतेने देहभान विसरून ' हेच आचार्य देव ' म्हणून श्री नेमीसागर महाराजांचे समोर दर्शनासाठी बसले. तेव्हा नेमीसागर महाराजांनी मात्र आचार्य श्री शेजारीच बसले आहेत असे हाताने संकेत करून सूचित केले. नंतर त्यांनी सिद्धभक्ति, श्रुतभक्ति व आचार्यभक्ति पूर्वक त्रिवार नमोऽस्तु केला. लगेच क्षणाचाहि विलंब न करता महाराजांनी योग्य भावाने प्रतिलेखन करून म्हटले, " आजपावेतो कोणी कितीही आपणाविरुद्ध
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org