________________
दीक्षाग्रहण व केवलज्ञानप्राप्ती
"शेतकऱ्याला त्यांचाच संशय आला व त्याचा राग दुणावला. नंतर गांवांत जाऊन हातोडा व खिळ्यासह दोन माणसांना घेऊन येऊन त्यानें महावीरस्वामींच्या दोन्ही कानांत खिळे ठोकले तरी ते शुक्लध्यानापासून चळले नाहींत. अशी श्वेतांबरग्रंथांतून कथा आहे. दिगंबरग्रंथांतून अनेक उपसर्गाची हकीगत नाहीं. असले भयानक उपसर्ग होण्याइतकी महावीरस्वामींची पूर्वकमें बलवत्तर नव्हती असें म्हणतात. पण असे उपसर्ग त्यांना झाले म्हणून मानले तरी कांहीं कमीपणा येत नाही किंवा शास्त्रमर्यादाहि सुटत नाहीं. त्या शेतकन्याचें हें कठोर कार्य संपतें न संपतें तोंच त्याचे बैल चरत चरत तेथेंच परत आले. तेव्हां त्या शेतकन्याला आपल्या नीच कृत्याबद्दल फार पश्चात्ताप झाला, पण त्याचा आतां काय उपयोग ? पुढील गांवीं गेल्यानंतर लोकांनी त्यांच्या कानांतून ते खिळे काढविले. तेव्हांच्या असह्य वेदना प्रभूंनी सहन केल्या व आर्तिध्यान केलें नाहीं. शेतक-याचें खिळे ठोकण्याचं काम चालू असतां इंद्रानें येऊन त्याचे पारिपत्य करण्याची इच्छा दर्शविली; पण प्रभूती त्याबद्दल नकार दर्शविला. स्वावलंबनाच तपश्चर्या पुरी करावयाची असा त्यांचा निर्धार होता. एकदा ते एका नदीजवळून चालले असतां तेथें एक विषारी सर्प त्यांना आढळला. त्याच्या फुत्कारानेच विषबाधा होत असे म्हणून त्या बाजूला न जाण्याबद्दल गांवकन्यांनी प्रभूंना सांगितलें होतें. पण महावीरस्वामी सरळपणे गेले तो त्या सर्पाजवळच आले. त्यानें एकदम दंश केला व प्रभूंच्या पायांतून दुधासारखें रक्त स्रवू लागले. पुढे त्या महासर्पाला जातिस्मरण झाले व मरून तो उत्तम गतीला गेला.
याप्रमाणे अनेक उपसर्ग श्वेतांबर ग्रंथांतून वर्णिलेले आहेत. त्यांवरून महावीर स्वामींनी किती खडतर तपश्चर्या केली हे दिसून येते. असे अनेक अनुकूल व प्रतिकूल उपसर्ग झाले तरी त्यांचे शुक्कज्ञान चळलें नाहीं हेंच विशेष होय. जसे रौद्रभयानक असे प्रतिकूल उपसर्ग झाले तसे सुंदर युवतीचे गाणे, नाचणें व इतर शृंगार चेष्टादिक अनुकूल उपसर्गहि झाले. पण कोणत्याहि उपसर्गाची बाधा महावीरस्वामींना होऊं शकली नाही. पावसाळ्याचे चार महिने सोडून आठ महिने प्रभु विहार करीत असत. पहिल्या वर्षाचा चातुafe त्यानीं अस्थिकग्रामांत केला होता. दोन चम्पापुरीत व एक पृष्ट चम्पापुरीत केला होता. बाकीचे आठ वैशाली व वणिक ग्रामांत केले होते.
बारा वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर सर्व पूर्वकर्माचा नाश झाला व नवीन ( ६९ )