________________
महावीरचरित्र
तोपर्यंत त्याला शरम आहेच. झांकन बेशरमपणे तो कसाहि वागत असेल; पण उघडपणे तसें त्याला वागवणार नाही. पण पापाचरणांत लाज असावी; पुण्याचरणांत ती कशाला ? दिगंबरत्व धारण करावयाचे आहे ते पुण्याचरणासाठी किंवा, पापक्षालनासाठीच. अर्थात् सर्व पापी विचारांचा त्याग केल्याशिवाय दिगम्बरत्व धारण करण्याचे धैर्यच होणार नाही. महावीरस्वामींनी घर सोडल्याबरोबर दिगंबरदीक्षा घेतली. कारण सर्व पापी विचारांचा त्यांनी कधीच त्याग केला होता.
दक्षिा घेतल्यानंतर लौकरच प्रभूना बुद्धि, विक्रिया, तप, बल, औषध, रस व क्षेत्र अशा सात त्र.द्धि प्राप्त झाल्या व मनःपर्यय ज्ञानहि प्राप्त झाले. आतां भगवान महावीर दिगंबरमुनींची कठिण व्रते आचरूं लागले व परीषह सहन करूं लागले. सहा सहा महिन्यांपर्यंतचे उपवास त्यांनी आदरले व पार पाडले. कौल्यिनामक क्षत्रिय जातीचा उल्लेख ग्रंथांतून सांपडतो. दिनिकाय नांवाच्या बौद्ध ग्रंथांतील कोल्यिजातीचे क्षत्रिय रामगांवांत बरेच होते असें महापरिनिव्वानमुत्तन्तांत म्हटलेले आहे. या जातीची राजधानी कुलपुर असावी. येथे आहार घेऊन महावीरस्वामी दशपुराला गेले होते. तेथेहि दृधभाताच्या भिक्षेचा त्यांनी स्वीकार केला. तेथून ते वनांत गेले व बारा प्रकारची त आचरूं लागले. पांच महाव्रतें, पांच समिति, तीन गुप्ती व चौयाशी हजार उत्तरगुण त्यांनी दीक्षा घेतल्याबरोबर धारण केले होते. पुढे ते उज्जयिनी नगरीला गेले होते. त्या नगरीजवळील अतिमुक्तक स्मशानांत ते ध्यानस्थ बसले. असतो भवनामक रुद्राने त्याना बरेच उपसर्ग केले; पण वीरप्रभूनी आपलें शुक्लध्यान मुळीच ढळू दिले नाही. तेव्हां भवरुद्राने त्यांची अतिवीर म्हणून स्तुति केली. उज्जयिन हुन प्रभू कौशंबीला गेले. तेथें चंदनबालेने घातलेल्या भिक्षेनें त्यांनी सहा महिन्यांच्या उपवासाचे पारणे केले. नंतर त्यांनी मौनव्रत धारण करून आपली बारा वर्षांची तपश्चर्या पुरी केली. एकदां कुमारगांवाजवळ ते कायोत्सर्ग करून ध्यानस्थ उभे असतां जवळच्या शेतांतील शेतकऱ्याने बैल सोडले व तो काही कामासाठी जवळच्या खेड्यांत गेला. तेथून बैल चरत चरत भलतीकडेच गेले. शेतकरी परत येऊन पाहतो तो तेथे बैल नाहीत. तेव्हा त्याल अतिशय संताप चढला व महावीरस्वामींना तो त्या बाबतीत विचारूं लागला. त्यांनी मौनधारण केले असल्यामुळे ते उत्तर देऊ शकले नाहीत. पण त्यामुळे
(६८)