________________
वीरजन्मकल्याणक
प्रमाणेच मातेच्या उदरातहि तीर्थकर त्रिज्ञानधारीच होते. चिखलाचा संपर्कहि नसला म्हणजे पाण्यांत खोलपर्यत बुडालेल्या कमलाच्या देठाला काही त्रास होतो काय ? नाही. त्याचप्रमाणे जिनेश्वराला गर्भात वास करूनहि मुळीच त्रास झाला नाही. त्रिशलादेवीचा देह शुभ्र झाला, जणुं काय वीरभगवानाचें धवल यशच बाहेर पडत होते. जिनेश्वराबद्दलची आपली भक्ति व्यक्त करण्यासाठी कुबेर सुंदर वस्त्र, उटी, पुष्पमाला, रत्नालंकार वगरे घेऊन त्रिशलादेवीची त्रिकाळ पूजा करीत असे. इतर स्त्रियाप्रमाणे त्रिशलादेवीला भलतेसलते डोहाळे झाले नाहीत. कुलाचारानुसार सिद्धार्थानें पूंसवनावधिहि केला.
योग्य कालानंतर सर्व ग्रह उच्चस्थानी येऊन त्यानी लग्न पाहिले असतां, चैत्र १. ॥ १३ स सोमवारी पहाटे चंद्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रांत असतां, त्रिशलामातेने श्रीभगवानाला जन्म दिला. भगवंताच्या जन्माबरोबर सर्व दिशा प्रसन्न झाल्या व सर्व प्राणिमात्राची अंतःकरणे प्रफुल्लित झाली. आकाश निरभ्र झाले. देव पुष्पवृष्टि करू लागले व दुंदुभिनाद होऊ लागला. त्रैलोक्याचे अद्वितीय स्वामी, संसारभ्रमणांतून जीवाला सोडविणारे, तीर्थकराचे वैभव असलेले बालक जन्मास आल्यामुळे इंद्राची आसनें कंपायमान झाली. अवधिज्ञानाने तीर्थकर जन्म झाला असें ओळखून धंटानाद करीत सर्व देवासमवेत इंद्र आनंदाने व विनतमस्तकानें कुंडग्रामाला आले. बालजिनेश्वराची पूजा करण्याबद्दल देवामध्येहि अहमहमिका मुरू झाली. नानाप्रकारचे रत्नालंकार, उत्तम वेष व सुंदर विमाने यांसह देवांनी सर्व आकाश घेरून टाकले. कुंडग्रामाच्या लोकांना मागे भिंत नसूनहि अंतरालांत देवादिकाची चित्रे कोणी काढली असें आश्चर्य वाटले. इतके ते देव स्तब्धपणे मार्गप्रतीक्षा करीत होते. ज्योतिर्लोकांत सिंहनाद करून चंद्रादिक ज्योतिर्देव गोळा करण्यात आले व ते सौधर्मेद्राला येऊन मिळाले. शंखध्वनीने भवनावासातील चमर वैरोचन वगैरे भवनवासी देव आपल्या परिवारासह सौधर्मेद्राला येऊन मिळाले. दुंदुभिनादानें व्यतरदेव गोळा झाले व ते कुंडपुराला आले. इंद्रादि
देवांनी बालजिनेश्वराचे दर्शन घेतले. नंतर जन्मकल्याणिक महोत्सवाप्रीत्यर्थ : मेरुपर्वतावर अभिषेक करण्यासाठी एक मायावी बालक त्रिशलादेवी राणीजवळ ठेवून इंद्रादि देवांनी जिनबालकाला ऐरावतावर इंद्राणीचे मांडविर ठेवून आकाशमार्गाने मेरूपर्वतावर नेले. मेघगर्जनेप्रमाणे गंभीर व कर्णमधुर वाद्यध्वनीने त्रैलोक्य व्यापून गेलें. किन्नरेंद्र गाणे गाऊ लागले. ईशानेंद्राने जिनबालकावर श्वेत छत्र