________________
महावीरचरित्र पर्वतावर इंद्रादि देवाकडून अभिषेक करण्यास योग्य असा होईल. पुष्पमालद्वयाच्या दर्शनामुळे तो यशाचा साठा संपादन करील. चंद्रदर्शन स्वप्नांत झाले असल्यामुळे तो मोहांधकाराचा नाश करणारा होईल. सूर्यदर्शनामुळे होणारा पुत्र कमलरूपी भव्यलोकांना आनंद देणारा होईल. मत्स्ययुगलांचे दर्शन झाले असल्यामुळे मुलाला अनंतसुखप्राप्ति होईल. स्वप्नांत कलश दिसले असल्यामुळे मुलाचा देह १००८ लक्षणांनी युक्त असेल. सरोवरदर्शनामुळे तो लोकांची पिपासा दूर करणारा होईल; आणि स्वप्नांत सिंहासन दिसले असल्यामुळे अंती तो उत्कृष्ठ पद म्हणजे मोक्षपद मिळवील. देवीवमानाच्या अवले कन'वरून असें सिद्ध होते की, तो देवगतींतून येथे जन्माला येईल. नागभवनाच्या दर्शनामुळे तो तीर्थप्रवर्तक होईल. रत्नराशीच्या अवलोकनावरून तो अनंत गुणांचा धारक होईल व स्वप्नांत अनि दिसला असल्यामुळे कर्मक्षय करणारा होईल.' वरीलप्रमाणे स्वप्नफल सिद्धार्थराजानें त्रिशलाराणाला सांगितले त्यामुळे तिला जन्मसार्थक्य झाल्यासारखे वाटले व इतर परिवारालाहि विशेष आनद झाला. मोक्षाधिकारी व धर्मप्रवर्तक असा पुत्र आपल्या पोटी जन्मणार असें ऐकून कोणाला बरें आनंद वाटणार नाही ? . पुढे तो प्राणतेंद्रदेव पुष्पोत्तरविमानांतून च्यवून धवलगजाच्या स्वरूपाने आषाढ शुक्ल षष्ठीच्या दिवशी उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर, चंद्र उन्नतावस्थेला प्राप्त झाला असतां त्रिशलादेवाच्या मुखांत प्रविष्ट झाला. त्याच क्षणी चार इंद्रांची सिंहासनें कंपायमान झाली व त्यावरून तीर्थकरांचे गर्भावतरण झाले हे ओळखून त्रिशलादेवीजवळ आले व दिव्य रत्नालंकार, गंध, पुष्पमाला व अमूल्यवस्त्रे वगैरेंनी तिचा सत्कार त्यांनी केला व थिकल्याणक महोत्सव करून परत देवलोकाला गेले. स्वतःच्या देहकांतीने आकाशाला प्रकाशित करणाऱ्या श्री, ही, धृति, लवणा, बला, कीर्ति, लक्ष्मी व वाक् या आठ देवता वृद्धिंगत होणाऱ्या आनंदासह इंद्राच्या आज्ञेनुसार त्रिशलादेवाजवळ आल्या. मुखांत लक्ष्मी, हृदयांत धृति, शरीरात लवणा, गुणामध्ये कार्ति, बळांत बळादेवी, महत्वामध्ये श्री, भाषणात वाक्देवी व नेत्रांत लज्जा या रीनीने त्या देवतांनी त्रिशलादेवीच्या शरिरांतील यथोचित स्थानीं वास केला. जगाला अद्विर्ताय नेत्राप्रमाणे असलेले प्रभु मातेच्या गर्भामध्ये विराजमान झाले होते, पण ते त्रिज्ञानधारी होते. उदयपर्वताच्या आड बालसूर्य असला तरी त्याला तेजस्वी किरण असतातच. त्या
(६०)