________________
महावीरचरित्र प्रकरण सहावें. वीरजन्मकल्याणक.
जो देवाणवि देवो जं देवा पंजलि नम संति ।
नं देवदेव महिअंसिरसा वंदे महावीरम् ॥ राजा सिद्धार्थ हे लिच्छविवंशाचे असल्यामुळे वैशालीपति मगधाधीश राजा चेटकाला आपली वडील मुलगी सिद्धार्थराजास देण्यास काहीच वाटले नाही. चेटक स्वतः खरा राजा व सिद्धार्थ वज्जियनसंघांतील ज्ञातिवंशातर्फे एक प्रतिनिधि म्हणूनच केवळ राजा; तरी पण सोयरिक करण्यांत चेटकाला अभिमानच वाटला. याचे कारण अर्थात्च सिद्धार्थराजाचे कुलशीलच होय. दोन्ही घराणी जैनधर्माचीव अनुयायी होती, पण मिद्धार्थराजा विशेष धर्मनिष्ठ होता. वैयक्तिक बाबीप्रमाणेच सार्वजनिक बाबतींतहि ते कुंडग्रामांत न्यायनिपुण व नि.स्वार्थी म्हणून प्रख्यात होते. ते अनेक विद्यापारंगत होते. आपल्या परुषार्थाने त्यांनी ज्ञातिवंशाला भूषविले होते. त्रिशालादेवीहि बापाप्रमाणेच अद्वितीय व गुणी होती. तिच्या गुणामुळेच तिला प्रियकारणी हे नामाभिधान प्राप्त झाले होते. सौंदर्य, दया व शील वगैरे गुण तिच्यामध्ये परिपूर्ण होते. विवाहाने बद्ध झाल्यानंतर एक मनाने व एक विचारानेच राजा सिद्धार्थ व त्रिशलादेवी संसार करीत होती. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हे दांपत्य त्याकाळी अगदी आदर्श म्हणून मानले जात असे.
एका रात्री त्रिशलादेवीला पडलेल्या सोळा स्वप्नांचे वर्णन असगमहाकवीने भापल्या वर्धमानचीरत्राच्या सतराव्या सर्गात खालीलप्रमाणे केले आहे. "इकडे ज्याचे देवगतींतील आयुष्य सहा महिने उरले आहे व जो पुढच्याच जन्मी संसारसमुद्र तरून जाण्यासाठी अद्वितीय असें तीर्थ निर्माण करणार आहे, त्या पुष्पोत्तर विमानातील प्राणतेंद्र देवाकडे सर्व देव गेले व त्याला नमस्कार करूं लागले. त्यावेळी अवधिज्ञान झालेल्या सौधर्म इंद्राने भावी जिनमाता जी त्रिशलाराणी तिची तुम्ही उपासना करा अशी कुंडलपवतावरील आठ दिक्कुमारींना आज्ञा केली. चूडामणी रत्नांच्या कांतीने जिचा पुष्पमुकुट शोभत आहे अशी चूलावती,
(५८)