________________
जन्मस्थान व वर्षनिर्णय
४७० वर्षे झाली अशी राजपट्टावली आहे. सरस्वतीगच्छाच्या पट्टावलीतील गाथेत स्पष्ट म्हटले आहे की, “ वीरात् ४९२, विक्रमजन्मान्त वर्ष २२, राज्यन्तवर्ष ४, " म्हणजे हीं सर्व समान होत. शक राज्यान्त वर्ष वीरनिर्वाणानंतर ४७० म्हणजे विक्रमजन्मान्तवर्ष बावीसावे. वयाच्या अठराव्या वर्षी विक्रमाला राज्याभिषेक झाला असल्यामुळे वीरात् ४९२ म्हणजे विक्रमाभिषेकाब्दपूर्व ४८८ वे वर्ष. म्हणजे इ. स. पू. ५४५-४४ होय. म्हणजे हल्लीं जो महावीरसंवत् गणला जातो तो खऱ्या वीर संवतापेक्षां अठरा वर्षांनी कमी आहे, हें साधार सिद्ध होत आहे. याप्रमाणे वीरजन्मवर्षनिर्णय करणे फार घोटाळ्याचे झाले आहे. शेवटी वाद एवढ्यावरच येऊन ठेपला आहे की, वीरनिर्वाणनंतर ४७० वर्षा विक्रमजन्म झाला आहे असे स्पष्ट लिहिले असतांना त्याप्रमाणें विक्रमसंवत् गुरू होण्यापर्यंतची १८ वर्षे अधिक धरून वीरसंवत् गणावयाचा कीं, तसे न करतां विक्रम संवतांत अंधपणाने ४७० वर्षेच तेवढों मिळवून वीरसंवत् गणावयाचा? कसें केलें पाहिजे ते वाचकांनीच ठरविलें पाहिजे. जैनग्रंथ हिंदी विश्वकोष, सरस्वतीगच्छाची पट्टावली, म. बुद्ध आणि भगवान महावीर - स्वामींच्या जीवनक्रमांत बसणारा मेळ, व बौद्ध ग्रंथ या सर्वाचेच आधार धाब्यावर बसवून देऊन कोणी तरी चुकून अठरा वर्षे न मिळवितां वीरसंवताची गणना केली म्हणून तीच चाले ठेवण्याचा हट्ट धरावयाचा हा केवढा कदाग्रह होय !
·
(129)