________________
महावीरचरित्र
ते केवळज्ञानी झाले व नंतर धर्मप्रभावना करून ते मोक्षाला गेले. त्यांना जे विशेष गुण होते ते सोडल्यास इतर सर्व बाबतींत प्रत्येक जीवाला वरील प्रकारच्या अवस्थेतूनच जावें लागतें. जसें ऋतुमान, दिनमान ठरलेले आहे तसेंच कालमानादि ठरलेले आहे. विशिष्ट कालांत धर्माची अभिवृद्धी व विशिष्ट कालांत धर्माला ग्लानि येत असते. तीर्थकर होण्याचेहि निश्चित काळ ठरलेले आहेत. याप्रमाणें अनंत कालच्या घडामोडींतून सुसूत्र इतिहास वरीलप्रमाणे पाहून खालीलप्रमाणे निश्चित सिद्धान्त काढतां येतात.
उत्तरध्रुवाकडून आलेल्या लोकांनी आपल्या पितृभूमीची गीतें भारतभूला मायभूमी बनविल्यावर गाण्याचा परिपाठ ठेवला. त्याप्रमाणे वेदांतील ऋचा म्हणजे उत्तरध्रुवाकडील नैसर्गिक वैभवांचें काव्यमय व सूत्रमय वर्णन होय. पुढे या टोळया गंगायमुनेच्या किनान्यापर्यंत आल्या. तेथील कमी दर्जाच्या लोकांना त्यांनीं आत्मसाद केलें. कच्चें मांस खाणें, गोरस पिणें व सुरापान करणे एवढ्यावरच न राहतां ते आतां एतद्देशीय लोकांकडून शेती करवून घेऊन कच्चें धान्य व कंदमुळेहि खाऊं लागले. भारतीय उच्च संस्कृतीशींहि त्यांचा पुढे संबंध आला, तेव्हां त्यांनी इंद्रादि देवांनाच देवता मानलें. पितृभूमीबद्दलच्या काव्यांतील ऋचांनाच या इंद्रादि देवांची स्तोत्रे बनविली व आपण खात असलेले पदार्थ अभिमुखांतून या देवतांना अर्पण करण्यास त्यांनी सुरवात केली. याप्रमाणे त्यांची एक यज्ञमार्गी वैदिक संस्कृति बनली. पुढे भारतीय संस्कृतीचा अधिक परिचय झाल्यावर त्यांना कळून आले की, इंद्रादि देवांची मानवगतीप्रमाणेच एक गती आहे. ते कांहीं पूजनीय देव नव्हत. तेव्हा संभवनाथतीर्थंकरांचे काळांत यज्ञमार्गीयावर लिंगी संस्कृतीचाहि परिणाम होऊन शिवपूजा सुरू झाली व अद्वैततत्त्वज्ञान निर्माण झालें. नंतर उपनिषदें व षड्दर्शनें निर्माण झाली. पुढे ईश्वरकर्तृत्वाचें खूळ निर्माण होऊन दशावतारांची कल्पना निघाली व मल्लिनाथ तीर्थंकरांचे कालापासून परशुराम, राम व कृष्ण या तिन्ही चक्रवतीना विष्णूचे अवतार समजून देवासमान पुजण्यास सुरुवात झाली. नंतर महावीर काळांतहि गौतमबुद्धाला विष्णूचा अवतार मानून बौद्ध म्हणून भजण्यास सुरुवात झाली. आता तर प्रत्येक विभूतीला देवावतार मानून त्याला पूजण्यांत येऊं लागलें आहे. हिंसात्मक यज्ञांचें मिथ्यात्व कमी झाले असले तरी अवतारांचे बंड फार वाढले आहे व या मिथ्यात्वाने सर्व जनतेला नाडलें आहे.
( ३२ )