________________
महावीर पूर्वकाल
सार एकच. धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक वगैरे बाबतींत प्राचीन काळी ठराविक स्वरूपाच्या व विलक्षण पण नियमसिद्ध अशा अनेक घडामोडी झाल्या, पण त्या सर्वांचे तात्पर्य हेच की, कषायामुळे जीव भवभ्रमण करीत असतो. कषायजनित कर्माचे बंधन संपले की, तो मुक्त होतो. जा अनादि अनंत आहे व परिवर्तनशाली आहे.
वारकालीन अनंत घडामोडींचा इतिहास आणखी सांगितला तरी जो या प्रकरणांत थोडा सांगितला आहे तसाच असणार. नांव व हकीगतीच तेवढ्या भिन्न, पण सर्वाचे सार एकच. हे सार जाणणे हाच इतिहासकथनाचा उद्देश आहे. या व मागील प्रकारणांत प्राचीन कालाबद्दलची जी चर्चा केली आहे तीवरून हेच दिसून येईल की, मिथ्यात्व व सम्यक्त्व फार अनादिकालापासून चालत आले आहे. मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक्त्वाचा स्वीकार केल्याशिवाय भवचक्रातून मुक्तता होणार नाही. हे सम्यक्त्व स्वावलंबनाचे जोरावर काहीजण प्राप्त करून घेतात, व काहीजणांना अत्यंत बलशाली अशा तीर्थकरांच्या आगमनाने प्राप्त होते. तथापि नवों कम सोडून देऊन जुन्या कर्मबंधांचा क्षय तपश्चर्यनं किंवा भोगून प्रत्येक जीवाला स्वतःच करावा लागतो. या बाबतीत दुसऱ्याचा उपयोग होणार नाही. जग हे अनाद्यनंत व स्वयंभू आणि परिवर्तनशाली आहे. जीवाला अनंत भवांतून मार्ग काढावा लागतो, पण शेवटी प्रत्येक भव्यजीवाला मोक्षप्राप्ति आहेच. मोक्षस्थिती मात्र अगदी स्वाभाविक व शाश्वत आहे. अनादि कालापासून अशा घडामोडी होत आल्या आहत. कालानुसार या घडामोडींत जो फरक दिसून आला त्यालाहि काही ठराविक नियम आहत व ते मागे दिलेच आहेत. अनेक सिद्ध महात्मे, राजे, मरदार, शेटसावकार व इतर प्रकारचे जीव होऊन गेले, हली आहेत आणि पुढे होतील, पण त्या सर्वांचे चरित्र बहुतेक सारखेच. त्या सर्वांच्या चरित्राचे सार मारखेच. मोक्षप्राप्तीच्या बाबतीत तांतडी चालत नाही. अनंत कालची कमें एकदम छेदली जात नाहीत. प्रयत्न सर्व जीवांना निश्चित स्वरूपाचेच करावे लागतात. कोणत्याही तीर्थकरांचं चरित्र पाहिले तरी त्याने पूर्वकर्मानुसार अनेक जन्ममरण भोगले, कर्मबंध अगदी पातळ झाल्यावर वैराग्य उत्पन्न झाले, तेव्हां त्यांनी दीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करून जुन्या कर्मबंधांचा क्षय केला व नवे कर्मबंध हे।ऊ दिले नाहीत. सर्व कर्माचा क्षय झाल्यावर
(३१)