________________
प्रस्तावना
आहे कीं, "There can be little doubt that the most important doctrives of the jina Religion have remained practically unaltered since the begining of our era. म्हणजे ख्रिस्त शकाच्या आरंभापासून जैनधर्माच्या बहुतेक महत्त्वाच्या तत्वामध्यें व्यवहारांत अजिबात फरक झाला नाहीं त्यांत तिळमात्र संशय नाहीं. तसेच मथुरा येथल शिलालेखावरून वुल्हरेसाहेबांनी जैनांचे रीतिरिवाज बहश कर्से विश्वसनीय आहेत हे दाखविले आहे. जैनसंप्रदाय बरेच दिवस जैनांच्या विशिष्ट स्वमत संरक्षक प्रवृत्तीमुळे जशाचा तसाच राहिल्याकारणाने व त्या परंपरागत आख्यायिका बहुतेकांशी विश्वसनीय असल्यामुळे संशोधकांनी आर्येतर संस्कृतीची थोडीतरी अज्ञातदालने प्रकाशित करण्यासाठी जैनधर्माचा व त्याबरोबरच सांख्य
"
बोद्धीचा अभ्यास करणे अत्यवश्य आहे. डॉ. याकोबी यांनी म्हटल्याप्रमाणं त्यायोगे भारतीय तत्वज्ञानरूपी प्रवाहाच्या एका अंधःकारमय कोपन्यावर जास्त प्रकाश पडण्यासारखा आहे. ज्या पुस्तकाला आम्ही प्रस्तावना लिहित आही त्या पुस्तकातील महावीर तीथकरावी जैनसंस्कृतीची पार्श्वभूमी काय होती याची कल्पना करून देण्यासाठी इतका उहापोह करण्यांत आला आहे.
बुद्धनिर्वाणापूर्वी हिंदुस्तानच्या इतिहासांत सर्वमान्य व निश्चित असा एकही कालविभाग किंवा तारीख नाहीं आणि पुढच्या काळांत मिळणाच्या तारखा जुजबी असून अजमासाने केलेल्या खुणाप्रमाणे केव्हा मागेपुढे सरकल्या जातील याचा कांहों नेम नाही. परंतु बुद्धानंतर लवकरच बोद्ध व जैनग्रंथ तरीच कोटिलिय अर्थशास्त्र व काही प्राचीन धर्मसूत्रे मिळतात व त्यायोगे तत्कालीन भारतीय, धार्मिक व सामाजिक परिस्थितीवर काहींना कांही तरी प्रकाश पडतो. पार्श्वनाथतुकर- ज्यांना जनसप्रदाय आपला तेविसावा तीर्थकर मानतो व ज्याला आधुनिक इतिहासकार जैनधर्माचा संस्थापक असे मानतात याच्या निर्वाणकालानंतर महावीरस्वाणी सुमारे १७८ वर्षांनी जन्मात आले. महावीरस्वामींचे वेळी पार्श्वनाथतीर्थंकराचे काही परंपराशिष्य हयात होते. तथापि या मध्यंतरीच्या काळी जैनधर्मास बरीच ग्लानी आली होती असे श्वेतांबर-आगमावरून समजते. आणि याचवेळी वैदिकधर्मास जास्त जोर मिळाला असावा व तसेच महावीर - काल निरनिराळ्या मतांचे पुरस्कर्तेही फार होऊन गेले असे बौद्ध व जैनप्राचीन वाङमयावरून समजते.
(१५)