________________
महावीरचरित्र
that jainism is an original system quite distinct and independent from all others; and that therefore it is of great importance for the study of philosophical thought and religious life in Ancient India." म्हणजे शेवटी मला निश्चितपणे असे सांगावयाचे आहे की, जैनधर्म हे एक स्वतंत्र दर्शन असून इतर दर्शनाहून अत्यंत भिन्न आहे. म्हणूनच प्राचीन भरतखंडांतलि तत्वज्ञानविचार व धार्मिक जीवन यांच्या अध्ययनासाठी त्या धर्माचे फार महत्त्व आहे.
प्रो. ज्वालाप्रसादहि असेच म्हणतात, The history of jainism for records back almost into the prehistoric past. जैनधर्माचा इतिहास देखील इतिहासकालापूर्वीच्या अज्ञातकाळात दूरवर जाऊन पांचतो.
कोणताहि धर्म प्राचीन आहे एवढ्यानेच त्याला काही वैशिष्टय येते असे थोडंच आहे. तरी पण इतिहासभक्तान प्रत्येक प्रश्नाचा निर्णय शोधकबुद्धीने लावणे अत्यवश्य आहे. वेद वगेरे ग्रंथांत जैनधर्माविषयी खात्रीलायक उल्लेख मिळत नाहीत याचे कारण हेच आहे की, ऋग्वेदाचे कित्येक भाग आर्यलोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी ६ कित्येक भाग पंजाबात लिहिले गेले त्यावेळी आर्यलोकांचे आर्थतर संस्कृतीबरोबर अजून संपर्कच झाला नसल्याने जैनधर्मासंबंधी स्पष्ट उल्लेख वेदांत मिळत नाहीत यांत कांहींच नवल नाही. १० वें मंडल अलिकडचेच आहे वें वर सांगितले आहे. यांत नाही म्हटले तरी ' मुनयोवातवसना' असा नग्नमुनीविषयी एक उल्लेख मिळतो. याच्यावरून दहावें मंडल लिहिले गेले त्यावेळी नग्न राहणाऱ्या भारतीय मूळनिवासी सन्याशी सांप्रदायाची थोडीबहुत माहिती झाली होती असे मानण्यास काही हरकत नाही. जैन लोकांत नम संप्रदाय फार प्राचीन कालापासून आहे हे उघडच आहे. व हा संप्रदाय त्यावेळच्या बहुनेक आर्यतरधर्मात असावा असे वाटते. कारण आजीविक वगरे पंथांतही नग्न राहण्याची मुभा होती. 'मुनयोवातवसनाः' हा उल्लेख जैनांना उद्देशन आहे अस बर साहेबांचेही मत आहे. कित्येक जनपंडितांचे मत असे आहे की, आपण आर्यच आहोत याला काहीतरी कारण असेल तर स्मृतिकालांत आर्य शब्दाला आचारनिदर्शक अर्थ प्राप्त झाला हेच होय. प्रो. याकोबी यांनी बरेच दिवसांपूर्वी बौद्धवाड्ययाच्या उल्लेखावरून असे सिद्ध करून दाखविलें
(१४)