________________
प्रकरण ४ थे.
एक आणीबाणीचा प्रसंग
Pr
ago
वदत्त रूपिणीस धमकी देऊन गेल्यानंतर त्याची क तिची पुन्हां भेट झाली नाही, किंवा त्याचे काय 1 झाले हे ही तिला कळले नाही. मात्र तो धमकी
देऊन गेल्यानंतर तिजवर एक चमत्कारिकच प्रसंग येऊन गुजरला.
रूपिणीच्या नवऱ्याचा असा एक नित्यक्रम असे, की, प्रहर रात्र टळली ह्मणजे शेतांतून घरी यावें. आणि पहांटेस कोंबडा आरवतांच पुन्हां शेतास जावें. त्याच्या बायकांच्या वर्तनांत सुधारणा झाल्यापासून तर त्याचा हा निश्चय कधीच चुकला नाही. त्याला आतां घरी येण्याची किती तरी ओढ लोगे, आणि केवढा तरी उल्हास वाटे !
गडद काळोख असो, की, पर्जन्याची झड लागलेली असो, तो कशाचीही परवा न करितां मोठ्या उत्कंठेने घराकडे येत असे.
गडद काळोखात नुकत्याच उज्वल झालेल्या त्याच्या रमणीच्या मुखचंद्राची स्मति त्यास दीपाप्रमाणे मार्ग दर्शक होई, आणि घरी आल्यावर तर तिच्या सस्मित मुखांतून निघालेल्या भाषणांनी त्याचा र शीण नाहीसा होई ? त्याला आपले घर म्हणजे आतां स्वर्ग वाढू लागले ? रमणी ! केवढे हे तुझें सामर्थ्य !