________________
कसोटीला उतरले.
३५
झालो आहे. मला माझ्या जिवाची देखिल परवा नाहीं ! ह्मणून तूं खुषीने जरी माझें ह्मणणे मान्य केलें नाहीस तरी मी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आज आपला इच्छित हेतू तडीस नेल्याखेरीज कधीही राहणार नाहीं !" __“जारे मुडदारा!" रूपिणी त्वेषानेच ह्मणाली.
" तुझेंच काय पण तुझ्या सारख्या जगांतील एकंदर नीच पुरुषांचे एकवटलेलें सामर्थ्यही आतां या रूपिणीस भ्रष्ट करूं शकणार नाहीं ! तूं माझ्या अंगाला नुसते बोट तर लाव, की, तूं नाही तर मी या दोघापैकी कोणी तरी त्याचक्षणीं गतप्राण झालेले आढळून येईल !" हे बोलत असतांना तिचे सांग थरथर कांपत असून तिचे डोळे इंगळाप्रमाणे लाल झाले होते!
देवदत्त एवढा पाजीपणांत निढावलेला पण तिची ही घोर प्रतिज्ञा एकतांच त्याचे धैर्य डळमळले. त्याच्या मनांत आतां अनेक विरुद्ध विचार घोळू लागले. आपल्या हेतूच्या सिद्धीस प्रस्तुत परिस्थिती अगदी प्रतिकूल आहे असेंही त्यास वाहूं लागले ! शिवाय तिचा नवरा येण्याची तर त्यास क्षणोक्षणी भीति वाटतच होती ! अखेर मागचा पुढचा नीट विचार करून, त्याने तेथून पाय काढतां घण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे ता बाहेर पडलाही मात्र जातां जातां " मी आपला हेतू सिद्धीस नेल्याखेरीज कदापि राहणार नाही," अशी धमकी तिला देण्यास तो विसरला नाही !
न